एक नव्हे तर पाच पाच तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून केले लग्न
सासरच्या लोकांकडून पैशे उकळण्याच्या उद्देशाने करत होता लग्न
बरहाट / नवप्रहार डेस्क
एका तरुणाने एक नव्हे तर पाच – पाच तरुणी सोबत प्रेमाचे नाटक करत त्यांना आपल्या जाळ्यात ओढले. आणि त्यांच्याशी लग्न केले. तो मुलींच्या माहेरच्या लोकांकडे पैशाची मागणी करत होता. पैशे न दिल्यास तो बायकोला सोडुन निघून जात होता. तरुणींचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या मुकुट हुसैन याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण –
या व्यक्तीने 5 तरुणींसोबत लग्न केले. मात्र, त्यामागे त्या तरुणींच्या कुटुंबीयांकडून हुंड्याचे पैसे घेणे हा त्याचा हेतू होता. पीडित तरुणींच्या कुटुंबांनी दिलेल्या माहिती दिली की, या तरुणाने आपल्या मेहुण्याच्या मदतीने हा कट रचून निष्पाप तरुणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्यांचे आयुष्य उद्धस्त केले.
मुकुट हुसैन नाम असे या आरोपीचे नाव आहे. त्यांना हुंड्यासाठी तब्बल 5 लग्न केली. आधी त्याने या तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि मग त्यांच्याशी लग्न केले आणि लग्नानंतर पुन्हा पुन्हा हुंड्याची मागणी केल्यावर त्याचा खरा चेहरा समोर आला.
मुकुटने तिताबोर येथील एका तरुणीसोबत लग्न केले. मात्र, काही महिन्यांनी व्यवसाय सुरू करण्याच्या नावावर तो आपल्या पत्नीला पैसे मागू लागला. मात्र, त्याच्या पत्नीच्या कुटुंबीयांनी पैसे देण्यास नकार देताच मुकुट हुसैन घरातून फरार झाला. पत्नीने फोन केल्यावर “मी जात आहे”, असे त्याने सांगितले. मात्र, एक वर्ष झाले तरी तो परत आला नाही. मग एके दिवशी तिताबोर येथील त्याच्या पत्नीला मुकुटने गोलाघाट येथील एका तरुणीसोबत लग्न केल्याची माहिती मिळाली.
तितोबार येथील या तरुणीला जेव्हा सत्य समजले तेव्हा मुकुटचा खरा चेहरा समोर आला. मुकुट हुसेनने गोलाघाट येथील एका तरुणीकडे पैशांची मागणीही केली होती. मात्र, तिच्या कुटुंबीयांनी पैसे न दिल्याने तो तिला सोडून पळून गेला. मुकुटवर पाच महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आणि हुंड्यासाठी लग्न लावल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर मुकुट हुसेन हा वेश्याव्यवसायात सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मुकुटचा मेहुणा कोलताता येथे राहतो. तो त्याला वेगवेगळ्या तरुणींसोबत लग्न करण्यासाठी मदत करतो, असा आरोप पीडित तरुणींनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. आता तितोबार आणि गोलाघाटच्या दोन पत्नींनी पोलिसांत धाव घेत न्यायाची मागणी केली. तर पोलिसांनी आरोपी मुकुट हुसैन विरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे.