स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येलाच लखाड सरंपचावरील अविश्वास प्रस्ताव पारित
– बहुमताने अविश्वास पारित झाल्याने सरंपचा कांचन लबडे पायऊतार-
अंजनगाव सुर्जी / मनोहर मुरकुटे
लखाड येथील सरपंचावर दि.७ आँगष्ट रोजी दाखल करण्यात आलेल्या अविश्वासावर आज दि.१४ आँगष्टला झालेल्या सभेत अविश्वास प्रस्ताव ७ मतांनी मंजूर झाला असून स्वातत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येलाच सरपंचाला पाय उतार व्हावे लागल्याने तालूक्यात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. लखाड येथील सरंपचा कांचन धम्मपाल लबडे या अडीच वर्षापुर्वी सर्वसाधारण महीला मधून सरंपंच पदावर विराजमान झाल्या होत्या,परंतू गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात ग्रामपंचायत सभासदाना विश्वासात न घेता मनाने कारभार करणे,काम करतेवेळी व कामकरते वेळी ठराव न घेणे, कार्यारंभानंतर ठराव घेणे,ग्रामपंचायतचे साहीत्य खरेदी करतांना आर्थिक गैरप्रकार सारखे गंभीर प्रकार करणे,सभेमध्ये उपस्थीत सदस्यांना सौजन्याची वागणूक न देणे,मंजूर झालेल्या कामाचे काम करु न देने,अशाप्रकारचे गंभिर आरोप लावित दि.७ आँगष्टला ९ पैकी ७ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव तहसिल कार्यालय येथे दाखल केला होता.तेव्हापासूनच अविश्वास ठराबाबत उलसूलट चर्चेला उधान आले होते.अखेर या अविश्वास ठरावावर आज दि.१४ आँगष्टला तहसिलदार ऋनय जक्कूलवार यांच्या अध्यक्षतेत ग्रामपंचायत लखाड येथे दुपारी १२ वा सभा पार पडली यावेळी ७ सदस्यांनी अविश्वासाच्या बाजूने तर १ सदस्य तटस्थ तर १ सदस्य अनूपस्थित राहून अविश्वास ठराव ७ मतांनी पारीत झाला. यावेळी तहसीलदार ऋनय जक्कुलवार,नायब तहसिलदार अविनाश पोटदुखे,सचिव प्रविण गीऱ्हे यांनी काम पाहीले.