नितीनजी यांच्या पाठ्पुरावा व मांगणीला अखेर यश !
भातकुली तालुका अखेर शासकीय मदतयादीत समाविष्ट ..
प्रतिनिधि / अमरावती :
*अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपदेसोबतच रानटी जनावरे, त्यात बाजारपेठेत त्यांची होणारी अवहेलना व इतर विविध समस्येमुळे आधीच शेतकरी व्याकूळ झाला आहे.त्यामध्ये आता शासनाच्या ‘मुघली फर्मान’ मध्ये झालेल्या नुकसांनासंदर्भात अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुका वगळण्यात आला होता.येथील शेतकऱ्यांच इतर तालुक्यातील शेतकाऱ्ऱ्यांच्या तुलनेत अति जास्त अतोनात प्रमाणात नुकसान दिसून येत होते. परंतु स्थानिक प्रशासन याबाबद उदासीन दिसून येत होते. परंतु समाजसेवी नितीनजी कदम यांच्या सततच्या पाठ्यपुराव्यामुळे प्रशासन खळबळूण जागे झाले.नितीनजी उपोरोक्त निवेदनात स्थानिक शेतकरी वर्गावर नुकसाभरपाईची मदत निधी बाबाद कश्या प्रमाणात अन्यायकारक भूमिका शासन घेत आहे याची जाणीव करून देत आपले निवेदन सादर केले होते.याच त्यांच्या निवेदन वेळी भातकुली तालुक्यातील शेकडो शेतकरी वर्गाचा समूह घेऊन प्रशासन दरबारी पोहोचले होते. संतप्त जमावाने कायदेशीररित्या नितीनजी यांच्या नेतृत्वात सदर मांगण्याच निराकरण केल्याचे चिन्ह आता शासनाकडून दिसून येत आहे.. नितीनजी यांच्या पाठ्यपुराव्यानंतर सुधारित आढावा जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार तालुकानिहाय सर्वेक्षणात भातकुली तालुक्याला २.२५ कोटी नुकसानग्रस्त धारकांना मदत प्रशासनाने जाहीर केली आहे. अपेक्षानीरास झालेल्या शेतकरी सदर मदतीमुळे भारावून गेला आहे.नितीनजी यांच्या कौतुकास्पद पाठपुरावा व यशस्वितेमुळे त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा आलेख वाढतांना दिसून येत आहे …*