Uncategorized

विद्यार्थ्यांच्या बेमुदत चिता आमरण उपोषणाला नितीन कदम यांचा पाठिंबा

Spread the love

विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आपल्या प्रतिक्रिया

सुरक्षा रक्षक भरती निकालाचा प्रश्न पेटला

अमरावती / प्रतिनिधी
सामाजिक प्रश्नांवर नेहमी चर्चेत असणारे नितीन कदम आपल्या सिनेस्टाईल आंदोलनामुळे नेहमी प्रकाशझोतात येत आहेत.शासनापर्यंत किंवा प्रशासन दरबारी जावून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत त्यांच्या दुष्काळी मदत अथवा पिकविम्याची रक्कम मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. अश्यातच नुकतंच महादेव कोळी जमातीच्या विवीध मुख्य ४ मागण्यांसंदर्भात त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह विधिमंडळ गाठत मुख्यमंत्री महोदय यांना घेराव घालत सर्वांचे लक्ष वेधले होते. दरम्यान मुख्यमंत्र्यांनीसुध्दा सकारात्मक प्रतिसाद देत नितीन कदम यांना चर्चेकरिता आमंत्रण दिले होते.
अश्यातच अमरावती शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कालपासून म्हणजेच १६ डिसेंबर २०२३ पासून विदर्भातील विविध जिल्ह्यामधील विद्यार्थी आपल्या सुरक्षा रक्षक भरती निकालाबाबत बेमुदत चिता आमरण उपोषण पुकारले आहे. दरम्यान उपोषणस्थळी एकही लोकप्रतिनिधी अद्यापपर्यंत पोहोचले नाही. ही खुप लाजिरवाणी बाब आहे. अश्यातच नितीन कदम यांनी आपल्या सामाजिक दायित्वचा परिचय देतं उपोषणस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. तसेच विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत सदर आंदोलनाला सोबत मिळून शासकीय दालनात सादर करण्याची ग्वाही यावेळी नितीन कदम यांनी दिली.
सदर आंदोलनं ऑल इंडिया पँथर सेना अमरावती यांच्या तर्फे घेण्यात आले आहे. सन २०२१ या वर्षी घेण्यात आलेल्या सुरक्षा रक्षक भरती निकाल अद्यापही विद्यार्थ्यांना जाहीर केलेला नसल्याचे येथिल विद्यार्थ्यांचं म्हणणे आहे. अजूनही परीक्षेसंबंधी ५०० विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत असतांना अजून निकाल जाहीर करायला सुरक्षा रक्षक मंडळ अमरावती व्यवस्थापनाला जाब विचारला आहे. सदर भरती प्रक्रियाबाबत ३१/०७/२०२३ रोजी गोपनीय अहवाल सादर झाला होता. परंतु अजूनही निकालाबाबतीत एवढा विलंब का ? असाही प्रश्न आता उपस्थित होतो आहे. दरम्यान विद्यार्थ्यांची आक्रमक प्रतिक्रिया या उपोषणस्थळी बघावयास मिळाली.

यावेळी नितीन कदम, स्वप्निल मालधूरे,अभिषेक सवाई , विवेक टपके, मयूर आगरकर, विनोद गव्हाणे, दिगंबर सरकटे , दयानंद नखरे, नफिसोद्दिन, प्रफुल्ल कथोळे, अक्षय बहुलकर, प्रवीण इंगळे, निलेश कोठे, अमोल महल्ले, सचिन सुर्वे, आकाश लोखंडे, प्रदीप जाधव, प्रकाश आडे, गजानन राठोड, श्रवण जाधव, गोपाल कोलटेके, मंगेश ठाकरे, अनंत भताने, वैभव बागडे, अक्षय काबनपुरे, अभिलाष दाभाडे, रामभाऊ डोंगरे, अमिताभ मिश्रा,अभिषेक बावस्कर, अमर लोखंडे, प्रवीण इंगळे, दिगंबर सरकटे, राहुल मनवरे, राजरत्न मानकर, सय्यद इरफान सय्यद गफ्फार, मो. साबीर शेख शब्बीर, मोहसीन नवाब आदि उपस्थित होते.

या आहेत विद्याथ्यांच्या प्रमुख मागण्या....

*🟠 सन २०२१ या वर्षात सुरक्षा रक्षक मंडळ अमरावती तर्फे घेण्यात आलेल्या ५०० परिक्षार्थी विद्यार्थ्यांच्या भरतीचा अंतीम निकाल तात्काळ जाहिर करण्यात यावा.*

*🟠 निकाल जाहीर झाल्यानंतर परिक्षार्थी विद्यार्थ्यांचे बी. फॉर्म भरुन तत्काळ नियुक्ती देण्यात यावी.*

*🟠 सुरक्षा रक्षक मंडळ विभाग अमरावती मध्ये सन २०२१ ते २०२३ पर्यंत किती आस्थापणा नोंदीत आहेत व सुरक्षा रक्षकाच्या किती जागा रिक्त आहेत याची माहीती देण्यात यावी.*

*🟠 सुरक्षा रक्षक मंडळ अमरावती यांनी सन २०२१ मधील भरती संदर्भात दि. ३१/०७/२०२३ रोजी शासन दरबारी जो अंतीम गोपनीय अहवाल सादर केला आहे त्याची प्रत देण्यात यावी.*

*🟠 सुरक्षा रक्षक मंडळ अमरावती मार्फत सन २०२१ रोजी घेण्यात आलेल्या भरतीचा निकाल लावण्यास विलंब का झाला या बाबत सुरक्षा रक्षक मंडळ अमरावती यांच्या वरिष्ठ अधिकारी यांची सी.बी. आय चौकशी करुन प्रसार माध्यांमान समोर प्रशासनाने माहीती द्यावी.*

*🟠ही भरती संपूर्ण कॅमेरा अंतर्गत पुर्णपणे पारदर्शकपणे झाली अशी ग्वाही सुरक्षा रक्षक मंडळ अमरावती यांच्या मार्फत देण्यात येत आहे. परंतु अजुन पर्यंत परिक्षेचा निकाल का लागला नाही याची योग्य ती माहीती प्रशासनाने विद्यार्थ्यांना द्यावी.*

 

नितीन कदम : या ५०० विद्यार्थ्यांच्या सुरक्षा रक्षक भरती प्रक्रिया संदर्भातील निकाल अजून का जाहीर झाला नाही. यामध्ये विविध प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. अद्याप या विद्यार्थ्यांचा निकाल आला नसून ते न्यायाच्या प्रतीक्षेत आज इथे उपोषण करायला बसले आहेत. आपल्या लोकशाहीप्रदान प्रशासन व्यवस्थेत आता विदयार्थ्यांना उपोषण करायला बसावे लागत आहे, यापेक्षा मोठी शोकांतिका नाही होऊ शकत. यावर लवकरात लवकर सुरक्षा रक्षक मंडळाचा हा भोंगळ कारभार समोर आला पाहिजे. अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलनं उभारून तोडगा काढणार.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close