सामाजिक

महादेव कोळी जमातीच्या व शेतकऱ्यांच्या विवीध प्रश्नावर नितीन कदम यांनी थेट गाठले विधिमंडळ

Spread the love

 

🔸 मुख्यमंत्र्यांना घेराव घालत मांडली प्रश्नांची यादी..!

🔸 नितीन कदम यांना वर्षा निवासावर निमंत्रण

प्रतिनिधि/ नागपूर

 

महादेव कोळी जमातीच्या विवीध ४ प्रमुख मांगण्यासंदर्भात गेल्या ६ डिसेंबर पासून आमरण उपोषणाला बसले असताना जाणीवपूर्वक विषय स्वतः हाताळण्याचे निवेदन यावेळी देण्यात आले. कोळी महादेव जमात गेल्या अनेक वर्षांपासून पायाभूत सुविधांपासून वंचित असताना त्यांचा वैध मांगण्याना पुरेसा आधार मिळाला नाही.महादेव कोळी जमातीच्या आंदोलनाचे खच्चीकरण होऊन अस्तव्यस्त अशी दैनिय अवस्था त्यांची असून सदर मागण्या मान्य करण्यात याव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली.*

*काय आहेत महादेव कोळी जमातीच्या मांगण्या*

*महादेव कोळी जमातीच्या प्रमुख ४ मागण्या*

*१) जाती आणि जमाती सुधारणा कायदा (१०८) १९७६ चा कायदा करण्यासाठी वापरलेले १९५० पूर्वीचे पुरावे विचारत घेउन अमरावती विभागातील कोळी महादेव जमातीच्या लोकांना जात प्रमाणपत्र येथील संबधीत उपविभागीय अधिकारी मार्फत त्वरित देण्यात यावे.*

*२) जाती आणि जमाती (सुधारणा कायदा) १०८/१९७६ चा कायदा करण्यासाठी वापरलेले १९५० पूर्वीचे पुरावे विचारत घेवून अन जमाती पडताळणी समिती अमरावती विभागातील कोळी महादेव जमातीला वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे.*

*३) जात प्रमाणपत्र देण्याचे विनियम २००३ अन्वये नियम (३ ख) करिता जाती आणि जमाती आर्वी रसेल लिखित मानव वंश शास्त्रज्ञ यांचे पान न. ५३२ ते ५३५ पर्यंत केलेला विस्तृत वर्णनात्मक पुरावा विचारात घ्यावा*

*४) विनिमय २००३ अन्वये ४(१) करिता मागितलेल्या वास्तव्याचा पुराव्या करिता १९५० पूर्वीची कोळी नोंद असलेल्या कोतवाल बुक नक्कल वास्तव्याचा पुरावा म्हणून वापरावा.*

*त्याचप्रमाणे अमरावती जिल्हातील शेतकऱ्यांच्या विवीध प्रश्नासाठी (मुख्यतः पिकविमा व दुष्काळी मदत) त्याचप्रमाणे महादेव कोळी समाजाच्या मुख्य ४ समस्येसंदर्भात नितीन कदम यांनी थेट विधिमंडळ गाठत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासमोर जिल्हयातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था दुर्देवी असून त्यांना निसर्गाचा प्रकोप व सावकारी कर्जाला बळी पळावे लागते.येथील शेतकरी आत्महत्येचा वाढता आलेख थांबायचं नावं नाही.अश्यातच विधिमंडळात येथिल लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने दखल घेत नाही.शासनाने मंजूर केलेल्या १७०० कोटी रुपयाचा अग्रिम पिकविमा हा जाहीर केला. त्या पिकविम्या रकमेमध्ये अमरावती जिल्ह्याच्या नावे फक्त ८ लाख रुपये देण्यात आली. त्या ८ लाख रुपायमध्ये शेतकऱ्यांची संख्या १०२६५ एवढी असून म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला ७८ रुपये येत आहे.*
*ही पिकविम्याची रक्कम देऊन एकप्रकारे चेष्टा केल्याचे निष्पन्न होते. यात सुधारणा करून शासनाने जाहीर केलेली २५ % रक्कम ही शेतकऱ्यांना देण्यात यावी. अन्यथा परिसरातील शेतकऱ्यांचा रोषाला सामोरे जावे लागणार अश्या प्रकारच्या आशयाचे निवेदन नितीन कदम यांच्याकडुन मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.*
*त्याचप्रमाणे यावेळीं नितीन कदम यांच्या प्रभावी आकर्षक शैलीमुळे प्रभावित होऊन वर्षा निवासस्थानी येऊन चर्चा करण्याचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिले.*
*दरम्यान यावेळी नितीन कदम यांच्या समवेत सोपान भटकर ,नाजूक भोपसे ,प्रमोद भोपसे ,प्रफुल्ल महल्ले ,बाबुलाल वानखडे ,रोशन सनके ,पांडुरंग बगाडे ,विनोद पतालिया,मोहन भातकुलकर ,स्वप्नील मालदुरे सोबतच जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close