घरफोडी मोटरसायकल चोरणारा अट्टल चोरटा वरूड पोलीसांचे ताब्यात
आरोपीचे ताब्यातून १लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी मुबीन शेख.
चांदुर बाजार
अमरावती ग्रामिण जिल्हयातील पोलीस स्टेशन वरूड हद्दीत मगील काही काळात घडलेल्या घरफोडीच्या तसेच मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांचा जलगतीने तपास करून गुन्हयात आरोपी निष्पन्न करणे व आरोपीस अटक करून गुन्हे उघडकीस आणणे बाबत मा. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामीण. यांनी तपास अधिकारी यांना मार्गदर्शन करून आदेशित केले होते.
दि. १३/०५/२०२३ रोजी वरूड पोलीसांचे पथक परिसरात गस्त करित असतांना गुप्त माहीती प्राप्त झाली की, वरूड़ बस स्थानक येथे आरोपी नामे शुभम ऊर्फ चिपलींग बंडु धाकडे, वय २२ वर्षे, रा. जुनी वस्ती कांडली, परतवाडा हा चोरी करण्याचे उद्देशाने संशयीतरित्या फिरत आहे. सदर माहीतीचे अनुषंगाने त्या परिसरात सापळा रचुन आरोपीस अटक करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्याचे मोटर सायकलने पळुन जाण्याचा प्रयत्न केला. सदर आरोपीतांचा पोलीसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले, प्रथम आरोपीने उडवा उडवीची उत्तरे दिली परंतु पोलीसांपुढे जास्त काळ आरोपीचा टिकाव लागला नाही. आरोपीने पोलीस स्टेशन वरूड हद्दीत मोटर सायकल चोरीचे ०३ घरफोडी ०१ असे एकुण ०४ तसेच पो.स्टे. परतवाडा हद्दीत मोटर सायकल चोरीचे ०१ घरफोडी ०१ असे एकुण ०२, पो.स्टे.चांदुर बाजार हद्दीत मोटर सायकल चोरीचे ०१, पो.स्टे. वलगांव हद्दीत घरफोडी ०१ असे एकुण ०७ गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे. आरोपीचे ताब्यातुन चोरीचे गुन्हयातील ०४ मोटर सायकल किं.०१,९५,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आले. पुढील तपास वरुड पोलीस करीत आहे.
सदरची कार्यवाही मा. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामीण. मा शशिकांत सातव, अपर पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामीण. डॉ. निलेश पांडे, उप-विभागीय पोलीस अधिकारी, मोशी यांचे मार्गदर्शनात. प्रदीप चौगांवकर, ठाणेदार, पोलीस स्टेशन वरूड, पोलीस उपनिरीक्षक धिरज राजुरकर, पोलीस अमंलदार राजु मडावी, रत्नदिप वानखडे, विनोद पवार, सचिन भगत, राजु चव्हाण, प्रफुल्ल लेव्हरकर, किरण गावंडे, पंकज कपिले यांचे पथकाने केली.