अपघात

चारचाकी वाहनाच्या समोरासमोर झालेल्या धडकेत  नऊ लोक गंभीर जखमी 

Spread the love
तिघांना अमरावती हलवले
मोर्शी(संजय गारपवार)
मोर्शी ते  वरुड राष्टीय  महामार्गावर झालेल्या दोन गाड्यांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत नऊ जण जबर जखमी झाले असून त्यातील तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे पाठवण्यात आले.
     आज दि. १७ चे दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास मोर्शीपासून सात किलोमीटर अंतरावरील दापोरी येथे क्रुझर कंपनीच्या एम एच २० बी ए ४६५६ या क्रमांकाच्या गाडीने संत्रा तोडीचे मजूर घेऊन जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या शेवरलेट कंपनीच्या एम एच ४८ एफ ४५७८ क्रमांकाच्या एन्जॉय या वाहनाला झालेल्या धडकेत पियुष काळे, सुभाष शुक्ला, बस्तीराम उईके, रामदेव उईके, मंगेश उईके, निलेश कडू, राजू धुर्वे, हंसलाल धुर्वे, सुभाष यादव हे नऊ जण गंभीर रित्या जखमी झाल्या असून त्यापैकी तिघांना गंभीर अवस्थेत अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दोन्ही वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मोर्शी पोलीस करत आहे. अपघाताची तीव्रता इतकी भयानक होती की काही काळाकरिता रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close