अमरावती शहरात पाच दिवसीय ‘जागतिक सद्भाव जागृती संमेलन…

अमरावती / प्रतिमिधी
अमरावती शहरातील ‘आनंदघन आध्यात्मिक बहुद्देशिय सेवाभावी संस्था’, द्वारा दि. १ ते ५ फेब्रुवारी २०२५ असा पंच दिवसीय ‘जागतिक सद्भाव जागृती संमेलन’ सोहळा होत आहे. अमरावती शहर येथे वरील संस्थेसह आणखी १३ सत्संगभक्त परिवारांच्या सौजन्याने संपन्न होत आहे. सोहळ्याचे कार्यस्थळ एम.आय.डी.सी. रोडवर शहनाई मंगलम् जुना बासपास रोड, अमरावती असून या ‘जागतिक सद्भाव जागृती संमेलना’ अंतर्गत दररोज तीन सत्रात विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. आमंत्रित सद्भक्तांचा परस्पर परिचय, सन्माननीय मान्यवरांचे स्वागत, सत्पुरूषांच्या शुभहस्ते संमलनाचे उद्घाटन संमेलनातील सत्रात नियमीत योगवर्ग, सुसंवाद, वैद्यकीय शिबीर, नैसर्गिक पुष्प प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन, प्रश्नोतरी चर्चा, प्रवचन, भजन, किर्तन, प्राचीन भारतीय परंपरेवर व्याख्यान, हिंदूसंस्कृतीनुसार विविध आचार-विचार यावर वैज्ञानिक दृष्टीने सुसंगत असा परस्पर संवाद, विविध भाषातील विविध गीतांचा संगीतमय सेवा कार्यक्रम, शास्त्रीय नृत्य, श्री गजानन विजय ग्रंथाचे विविध भाषेतून अध्यायांचे वाचन, उपस्थित परराज्यीय, परप्रांतीय आणि परराष्ट्रीय विचारांचे, संस्कृतीचे वैचारीक आदान-प्रदान, सद्भाव प्रवृत्तीचे वैचारीक मंथन आणि सद्भाव जागृती म्हणून माणुसकीचे ज्वलंत अनुभव असे सेवाकार्य संपन्न होणार आहे. सोबतच संमेलनस्थळी निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, चहा-नाश्ता व्यवस्था इत्यादी सर्व सेवा उपलब्ध असल्याचे जागतिक सद्भाव जागृती संमेलन समिती, अमरावती यांचे तर्फे कळविण्यात आले आहे.
तरी या संमेलनात सहभाग घ्यावा व तन-मन-धनाने सक्रिय सहकार्य करावे, ही सर्व सत्संग परिवाराकडून विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे.