निलेश बाभळे बहुजन विद्यार्थी फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी
यवतमाळ – बहुजन विध्यार्थी फेडरेशनच्या मारेगव तालुका उपाध्यक्षपदी निलेश दामेश्वर बाभळे यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे. निलेश भाबळे हे कोसारा येथील रहिवाशी आहेत .एम.ए इंग्रजी व औषधीशास्त्र विषयात ते पारंगत आहेत. संगीत,क्रिकेट व बुद्धिबळ क्षेत्रात त्यांना विशेष रुची असून सामाजिक कार्याची आवड आहे.
त्यांच्या नियुक्तबद्दल बहुजन विद्यार्थी फेडरेशनचे जिल्हा प्रभारी प्रा.भरत कुमार, जिल्हा अध्यक्ष अविनाश फुटाणे, जिल्हा उपाध्यक्ष रिया कुळसंगे,मारेगाव तालुका अध्यक्ष प्रिती केरामसहित इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कौतुक केले आहे.मारेगाव तालुक्यातील युवक, युवती व शाळा – महाविद्यालयमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व क्रिडा विषयक अडचणी, समस्या आणि प्रश्न सोडविण्यासाठी आपण नेहमीच तत्पर राहणार असुन संपर्क साधावा, असे आवाहन नवनियुक्त बहुजन विद्यार्थी फेडरेशनचे मारेगाव तालुका उपाध्यक्ष निलेश बाभले यांनी केले आहे.