आरोपीस अटक करण्यास गेलेल्या एनआयए च्या पथकावर हल्ला
मिदनापूर (पश्चिम बंगाल)/ नवप्रहार मीडिया
पश्चिम बंगाल मधून एक खळबळजनक घटना समोर येत आहे. येथे आरोपीस अटक करण्यासाठी आलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणा (एन आयए ) च्या पथकावर हल्ला करण्यात आला आहे. त्यात दोन अधिकारी जखमी झाले आहेत. तर वाहनाच्या काचा फुटल्या असून वाहनाची तोडफोड झाली आहे.
तृणमूल कॉँग्रेसच्या नेत्याच्या घरी 2022 मध्ये झालेल्या बॉम्बस्पह्ट झाला होता. या प्रकरणात कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशावरून एनआयएकडून अधिक तपास सुरू आहे. बॉम्बस्फोटासंदर्भातील चौकशीसाठी एनआयएकडून संशयितांना नोटिसा देण्यात आल्या होत्या, मात्र ते चौकशीसाठी हजर झाले नव्हते. एनआयएचे पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी भूपतीनगरमध्ये आले असता संतप्त जमावाने त्यांच्यावर हल्ला केला.
एनआयएचं पथक संशयितांना घेऊन माघारी परतत असताना ग्रामस्थांच्या जमावाने त्यांचे वाहन अडवले. तसेच त्यांना सोडण्याची मागणी केली. मात्र एनआयएच्या पथकाने त्यास नकार देताच जमाव संतप्त झाला आणि पथकाच्या वाहनावर हल्ला केला. यात कारच्या काचा फुटून एनआयएचे दोन अधिकारी जखमी झाले, मात्र एनआयएचे पथक जमावाच्या तावडीतून सुटून पोलीस ठाण्यात पोहोचण्यामध्ये यशस्वी झाले.
मध्यरात्री छापा का टाकला?
एनआयएने मध्यरात्री छापा का टाकला? त्यांनी पोलिसांची परवानगी घेतली होती का? मध्यरात्री आलेल्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीला जशी प्रतिक्रिया द्यायला हवी होती, तशीच स्थानिकांनी दिली. निवडणुकीच्या आधी लोकांना अटक का करत आहेत? भाजपाला असे वाटते की ते प्रत्येक बूथ एजंटला अटक करतील? यासाठी एनआयएला काय अधिकार आहेत? असा सवाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
महिलांवरहल्लाकेल्याचादावा
एनआयएच्या अधिकाऱयांनी भूपतीनगरमध्ये महिलांवर हल्ला केल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. त्या म्हणाल्या, ‘एनआयएचे अधिकारी लोकांच्या घरात घुसत असतील तर तुम्हाला काय अपेक्षा आहे? भाजपाला पाठिंबा देण्यासाठी हे सर्व केले जात आहे, पण आम्ही सर्वांना आवाहन करतो की, भाजपाच्या या अशा पद्धतीच्या राजकारणाविरोधात लढा’.