हनिमून ला गेलेल्या नवविवाहित दामत्यात उडाले खटके प्रकरण पोहचले ठाण्यात
नवऱ्याचे लफडे असल्याचा बायकोचा आरोप
हरिद्वार / नवप्रहार डेस्क
नवीन लग्न झालेल्या नव दाम्पत्याला एकमेकांना समजून घेता यावे यासाठी त्यांना हनिमून वर पाठवण्याची परंपरा मागील काही काळापासून रूढ झाली आहे. या काळात दोघांना एकमेकांच्या स्वभावाबद्दल माहिती होईल आणि दोघे एकमेकांच्या आवडीनिवडी आणि अन्य सवयी समजून घेतील हा त्यामागचा उद्देश. पण हनिमून एका कपल साठी फारकतीचे कारण ठरले आहे. चला तर पाहू या नेमका प्रकार काय ?
घटना उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील ज्वालापूर येथील आहे.उत्तराखंडमधील पती-पत्नी लग्नानंतर हनिमूनला जम्मू-काश्मीरला गेले होते. पण तिथं वराची कृती पाहून पत्नी इतकी नाराज झाली की दोघांमध्ये भांडण सुरू झालं. दोघंही हनिमूनवरून परतताच वधूचा छळ सुरू झाला आणि आता हे लग्न तुटण्याच्या मार्गावर आहे.
तरुणीने पोलीस ठाणे गाठलं. रडत रडत तिनं पोलीस अधिकाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला. पीडितेने सांगितलं की, ‘माझा विवाह हरियाणातील अंबाला जिल्ह्यातील अंकुर बंगा याच्याशी डिसेंबर 2023 मध्ये झाला होता. अरेंज मॅरेज होतं. लग्नानंतर मी खूप आनंदात राहेन असं वाटलं. मी माझ्या पतीसोबत हनीमूनला काश्मीरला गेले होते.
पीडितेने सांसांगितं की, ‘हनीमूनदरम्यान माझा नवरा अनेकदा कोणाशी तरी मोबाईलवर बोलत असे. मी विचारल्यावर तो नेहमी म्हणाला की तो मित्रांशी बोलतो. सुरुवातीला मी ते सत्य म्हणून स्वीकारलं. मात्र तो रात्रंदिवस मोबाईलवरच राहिला. मग एक दिवस जेव्हा तो बाथरूममध्ये गेला तेव्हा मी त्याचा फोन चेक केला आणि कळलं की तो एका मुलीशी बोलत आहे. दोघांनीही एकमेकांना विचित्र मेसेज पाठवले होते. यावरून मला कळले की माझ्या नवऱ्याचे कोणत्या तरी मुलीसोबत अफेअर आहे.
मुलीने पोलिसांना पुढे सांगितले की, ‘माझा नवरा बाथरूममधून बाहेर येताच मी मुलीशी गप्पा मारल्याबद्दल प्रश्न विचारला, त्यानंतर त्याने मला मारहाण करण्यास सुरुवात केली. आमचं नुकतंच लग्न झालं होतं. त्यामुळे मी ती गोष्ट विसरले.
घरी आल्यानंतर सासरच्यांकडून अत्याचार
मग आम्ही दोघं घरी परतलो. पण माझ्या नवऱ्याच्या सवयी अजिबात बदलल्या नाहीत. तो मुलीशी सतत बोलत राहिला. मी याला विरोध केला असता त्यांनी माझ्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. एके दिवशी माझ्या सासू आणि सासऱ्यांनी मला बेदम मारहाण केली आणि माझ्याकडून हुंड्याची मागणी करण्यास सुरुवात केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.