राज्य/देश

कोरोनाच्या नवीन व्हेरियंट ची राज्यात एन्ट्री ; एकाच दिवशी सापडले 91 रुग्ण 

Spread the love

मुंबई / नवप्रहार डेस्क 

                 साधं नाव जरी काढलं तर आठवतात ते दिवस त्या काळात असा एकही दिवस गेला नाही की देशात मारणाऱ्यांची संख्या हजारो आणि लाखोंच्या घरात असायची. बरोबर ओळखलं होय आम्ही कोरोना बद्दलच बोलतोय ! यातून देश कसाबसा सावरला त्यानंतर कोरोनाच्या नवीन व्हेरियंट जेएन 1 आला. सध्या राज्यात केपी 2 (प्लर्ट ) या विषाणू व्ही एन्ट्री झाली आहे. राज्यात या विषाणू चे 91 रुग्ण आढळले आहेत. नागरिकांनी काळजी न करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. 

आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत नव्या व्हेरियंटच्या 91 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. जे लोक आधीच मधुमेह, हायपरटेन्शन, हृदयविकार यांसारख्या इतर आजारांनी त्रस्त असल्याने काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

या रुग्णांपैकी पुण्यात 51, ठाण्यात 20, अमरावतीमध्ये 7, छत्रपती संभाजीनगरमध्ये 7, सोलापूरमध्ये 2, अहमदनगर, लातूर, सांगली आणि नाशिकमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.

शनिवारी राज्यात 4 नवीन कोविड रुग्ण आढळून आले, त्यात मुंबईत ३ आणि नागपूरमध्ये एक रुग्ण आढळला आहे. नव्या व्हेरियंटचे जिनोम सिक्वेन्सिग हे महिनाभरापूर्वीचे असून या व्हेरियंटचा कोणताही धोका नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे साथरोग सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी सांगितले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close