राज्य/देश

न्यायाधीश लाच प्रकरणात नवीन ट्विस्ट 

Spread the love

 नवप्रहार डेस्क /सातारा 

                    न्यायाधीश लाच प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात आणखी एक आरोपी वाढला आहे. हा नविन आरोपी पोलीस अधिकारी असल्याचे समोर आले आहे. आरोपी किशोर खरात हे सहाय्यक पोलिस निरिक्षक असल्याचे तपासात उघड झाले आहे.

किशोर खरात हे मुंबई पोलीस खात्यात कार्यरत असून वरळी येथे ते कार्यरत असल्याची माहिती पुढे आली आहे. तर न्यायाधीश धनंजय निकम यांची पाच लाखांची लाच घेण्याच्या प्रक्रियेत किशोर खरात यांचाही समावेश असल्याचे उघड झाले आहे. तर धनंजय निकमसह चौघांचा काल सातारा जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला होता. परिणामी या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले असून या प्रकरणात आणखी एक बडा मासा गळाला लागला आहे.

साताऱ्यात लाच घेणाऱ्या न्यायाधीशप्रकरणात नवा ट्विस्ट

आरोपीस जामीन मिळवून देण्यासाठी चक्क न्यायाधीशांनीच लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार साताऱ्यातून समोर आला होता. विशेष म्हणजे एसीबीने रंगेहात पकडल्याने हा भांडाफोड झाला. साताऱ्यातील सत्र न्यायालय परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये न्यायाधीश (Judge) महोदयांसह आणखी तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपींना ताब्यात घेतलं होतं. त्यामध्ये, चक्क न्यायाधीश महोदयांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपींच्या जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला असता, सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने (Court) आरोपी न्यायाधीश महोदयांचा जामीन फेटाळला आहे. त्यामुळे, लाच घेणाऱ्या न्यायाधीश महोदयांना न्यायालयानेच फटकारल्याचं दिसून आलं.

5 लाख रुपयांच्या लाचप्रकरणी रंगेहात एसीबीच्या जाळ्यात

साताऱ्यातील लाच प्रकरणी दाखल गुन्ह्यात न्यायाधिशांचा जामीन अर्ज सातारा जिल्हा न्यायालयाने काल(शुक्रवारी) फेटाळला. 5 लाख रुपयांच्या लाचप्रकरणी जाळ्यात अडकलेले धनंजय निकम यांच्या जामीन अर्जावर काल सुनावणी झाली. त्यावेळी, न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार देत त्यांचा अर्ज फेटाळून लावला. सातारा लाच लुचपत अधिकाऱ्यांनी सापळा रचून न्यायाधीश निकम यांच्यासह चौघांना रंगेहात पकडले होते. त्यानंतर, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. एका खटल्यातील संशयीत आरोपीला जामीन देण्यासाठी न्यायाधिशांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. त्याबद्दल तक्रारदाराच्या माहितीवरुन लाच लुचपत विभागाने छापा मारत ही कारवाई केली होती.

सर्वसामान्यांच्या न्याय-हक्काचे ठिकाण म्हणून न्यायालयाकडे पाहिले जाते. पोलिसांकडून अन्याय झाल्यानंतरही न्यायालयात आपण पाहू, न्यायालयात आपणास न्याय मिळेल, अशी भावना सर्वसामान्यांची असते. मात्र, न्यायाधीश महोदयच लाच घेताना रंगेहात पकडल्यामुळे न्यायपालिकेवरही शंका उपस्थित झाली. तसेच, न्यायालयाच्या कामकाजाला धक्का पोहोचवण्याचं काम न्या. निकम यांच्या कृत्याने केलं. मात्र, त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने अर्ज फेटाळला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close