हटके

हॉटेल मध्ये बॉयफ्रेंड सोबत पकडलेल्या गेलेल्या महिलेच्या स्टोरीत नवा ट्विट 

Spread the love

महुरानीपूर / प्रतिनिधी 

          हॉटेल मध्ये बॉयफ्रेंड सोबत पकडल्या गेलेल्या महिलेने पोलिस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे नोंदविलेल्या तक्रारीनंतर स्टोरीत नवीन ट्विस्ट आला आहे.  महिलेने तक्रारीत शेजारच्या त्या तरुणावर तिला तरुण ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप केला आहे. घटनेच्या दिवशी त्याने तिला हॉटेल मध्ये भेटायला बोलावून तिच्यावर बळजबरी केल्याचा आरोप केला आहे. 

महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, तिच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाला पीडितेच्या लग्नाआधीच्या तिच्या प्रियकाराबद्दल माहिती मिळाली होती.याच गोष्टीचा फायदा घेत तो तरुण पीडितेला मागील दीड वर्षांपासून ब्लॅकमेल करत होता.

खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी

पीडित महिलेने तक्रार करताना सांगितलं की, आरोपी तरुण पीडितेच्या आधीच्या प्रियकरासोबतच्या फोटो आणि व्हिडीओचा वापर करत तिला धमकी देत होता. तसेच, आरोपी पीडितेला सतत म्हणायचा की, “जर तू माझं ऐकलं नाहीस तर तुझे प्रायव्हेट फोटो व्हायरल करेन आणि तुझ्या प्रियकराबद्दल तुझ्या पतीला तसेच कुटुंबियांना सगळं काही सांगेन.”

वारंवार हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलवायचा

आरोपीच्या या धमक्यांना घाबरून महिलेने बऱ्याचदा त्या तरुणाला पैसे सुद्धा दिले. महिलेने याबाबत सांगितलं की, आरोपी वेळोवेळी तिला भेटण्यासाठी बोलवायचा आणि तिने भेटायला नकार दिल्यास तिला जीवे मारण्याची धमकी द्यायचा. नुकतंच, त्या तरुणाने पीडितेला फोन करुन मऊरानीपुर येथील एका हॉटेलमध्ये बोलवलं आणि तिथे त्याने बळजबरीने महिलेवर बलात्कार केल्याचा पीडितेने आरोप केला. पीडितेचा पती त्या हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर, आरोपी तरुणाने त्याला खोटं सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असल्याचं महिलेने सांगितलं.

पीडितेचे तरुणावर गंभीर आरोप

याशिवाय, पीडित महिलेने तरुणावर बरेच गंभीर आरोप केले आहेत. याबाबत पीडित महिलेने स्पष्टपणे सांगितलं की, तिच्या पतीने ज्या तरुणाला पकडलं तोच गेल्या दीड वर्षांपासून तिला ब्लॅकमेल केलं आणि तिचं शारीरिक शोषण केलं. तसेच, हॉटेलमध्ये तिच्या पतीने आरोपीला बेदम मारहाण केली तरीसुद्धा त्या तरुणाने पीडितेचे फोटो आणि व्हिडीओ करण्याची धमकी दिल्याचं महिलेने स्पष्ट केलं. पोलिसांनी आता महिलेच्या तक्रारीच्या आधारे, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close