राजकिय

प्रकाश आंबेडकर यांच्या त्या वक्तव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ

Spread the love

पुणे / नवप्रहार न्यूज नेटवर्क

            महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही घडत आहे ते पाहून राजकीय भाकीत वर्तविणाऱ्या भविष्य काराला देखील काही वेळा तोंडात बोट घालावी लागतात. पण सध्या अजित पवार यांची दिसत असलेली नाराजी आणि काका शरद पवार यांच्या कडून येणारे स्टेटमेंट यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात काहीतरी घडणार असा अंदाज बांधला जात आहे.अश्यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी येणाऱ्या 15 दिवसात दोन बॉम्ब स्फोट होणार आहे असे वक्तव्य केल्याने  राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. हे वक्तव्य त्यांनी पुण्यात  एका कार्यक्रमासाठी आले असताना केले आहे.

 राज्यात सुरू असलेल्या राजकारणाविषयी विचारले असता आंबेडकर म्हणाले, की “15 दिवसानंतर महाराष्ट्राच्या राजकारण मोठा बॉम्बस्फोट होणार आहे. आणि हा एक नसून 2 बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा प्रकार आंबेडकर यांनी केला आहे. शिवसेने बरोबर वंचितच्या पदाधिकारी पातळीवर बैठका सुरू आहेत. आमच्या युतीची काळजी करू नका, असा टोलाही विरोधकांना लगावला आहे.

पुलवामा बाबत त्यावेळी ही मी बोललो होतो, जी गाडी ब्लास्ट केली. त्याला प्रोटेक्शन नव्हतं. ही माहिती मला मिळते तर सरकारलाही मिळू शकते. पण सरकारला राजकारण करायच होतं.

दहा गाड्या कॅनॉव्ह बद्दलची साधी बाब कॉन्स्टेबलला माहिती आहे, ती बाब यांना माहिती नसावी. यांची साधी चौकशी सुद्धा नाही. पॉलिटिकल राजकारणासाठी या जवानांचा बळी दिलाय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आमदार अपात्र झाले तरी सरकार स्थिर, अजित पवारांचं मोठं वक्तव्य जरी 16 आमदार अपात्र झाले तरी देखील सरकार स्थिर राहील असा अप्रत्यक्ष दावाच त्यांनी केला आहे. एवढंच नाही तर त्यांनी 16 आमदार अपात्र जरी झाले तरी सत्ताधारी पक्षाकडे कसं बहुमत राहिल याचं गणितच मांडलं आहे. यावेळी बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, अपक्ष धरून भाजपकडे 115 आमदार आहेत. 106 त्यांचे आणि नऊ अपक्ष. एकनाथ शिंदेसोबत गेलेले 40 आमदार, 10 अपक्ष आमदार थोड्यावेळ बाजूला ठेवले तरी दोघं मिळून 155 आणि 10 अपक्ष असे 165 आमदार सध्या सरकारकडे आहेत. त्यामळे जरी 16 आमदार अपात्र झाले तरी देखील सरकारकडे बहुमताचा आकाड कायम राहणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close