नवीन बस स्थानक चौकात युवा स्वाभिमान पार्टी, भाजपा व शिवसेना शिंदे गटाच्या वतीने महा विकास आघाडीचा निषेध….

अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
अंजनगाव सुर्जी येथील नवीन बस स्थानक चौकात दिनांक २१ ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजता युवा स्वाभिमान पार्टी, भारतीय जनता पक्ष व शिवसेना शिंदे गटाच्या वतीने महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला असून. गेल्या आठ दिवसांपासून महविकास आघाडी कडून विद्यमान भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँगेस सरकारचा विनाकारण बदनामी करुन प्रौपोगंडा करण्याच्या अनुषंगाने केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी मी नाही त्यातली कडी लावा आतली या म्हणी प्रमाणे केवल आपणच खरे याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चे, आंदोलने करून आपणच खरे आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे,परंतु कंत्राटी पद्धतीने शाळांवर शिक्षक नेमणे यसेच इतरही विभागात कंत्राटी नोकर भरती करणे ही अमलबजावणी तत्कालीन महाविकांस आघाडीच्या सरकारनं हा निर्णय घेवून त्याच्यावरच शिक्का मोर्तब केले होते.त्यावर त्या नियमाप्रमाणे सद्या स्थितीत जुन्या नियमाप्रमाणे अमलबजाणी सुरु होती परंतू सद्याच्या युती सरकारला हे मान्य नसतांना सुध्दा जनते समोर सत्य येणे आवश्यक होते यासाठीच विनाश काले विपरीत बुद्धी या उद्देशाने तत्कालीन आघाडी सरकार मधील नेत्यांनी गेली आठ दिवसापासून आंदोलने करून त्यांच्याच डोक्यावर खापर फोडून घेतले विवीध ठिकाणी आंदोलने काढून स्वतःची खोटी सिद्धता साध्य करण्याचा प्रयत्न केला.परंतु यामध्ये जो नोकर भरतीच्या जी आर होता तो जी आर तत्कालीन उद्धव सरकारचा कार्यकाळातील असल्याचं सिद्ध झाले, आणि तो ठाकरे सरकारने काढलेला जि आर फडण्विस सरकारने त्वरित रद्ध सुद्धा केला त्या निषेधार्थ आज संपुर्ण महाराष्ट्राभर तत्कालीन सरकारचा व मोर्चे करांचा निषेध करण्यात आला त्या अनुषंगाने अंजनगाव सुर्जी येथील नवीन बस स्थानक चौकात युवा स्वाभिमान पार्टी भाजपा, शिंदे गटाचे पदाधिकारी तत्कालीन महविकस आघाडी चा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. याप्रसंगी अंजनगाव सुर्जी शहर, ग्रामीण भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते,युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी, भाजपा पदाधिकारी व शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.