नेत्याच्या वरदहस्ताने कला केंद्रात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांची धाड
पाच अल्पवयीन मुलींसह महिलांची सुटका
बीड / नवप्रहार मीडिया नेटवर्क
बीड मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कला केंद्राच्या नावावर वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पोलिसांनी कला केंद्रावर छापा टाकून ५ अल्पवयीन मुलींसह काही महिलांची सुटका केली आहे. या गैरकायदेशीर कामाला ठाकरे गटाच्यया बड्या नेत्यांचे वरदहस्त असल्याचे बोलल्या जात आहे.
आयपीएस पंकज कुमावत यांच्यासह टीमने या सर्व प्रकाराचा पर्दाफाश केला असून याप्रकरणात 36 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नाकर शिंदे असं गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो ठाकरे गटाचा जिल्हाधिकारी असल्याचं सांगितलं जात आहे.
मात्र त्यानंतर या कलाकेंद्राच्या अड्ड्यावर जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांची स्कॉर्पिओ आणि इनोव्हा दोन्ही गाड्या मिळून आल्या आहेत. या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या उमरी येथील महालक्ष्मी कलाकेंद्रावर हा सर्व प्रकार सुरू असल्याचं पोलीस कारवाईत समोर आलं आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे हे तिथं होते मात्र लगेच पळून गेले, अशी माहिती देखील पोलिसी खबर्यामार्फत मिळाल्याचं एफआयआरमध्ये नमूद आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या केज तालुक्यातील उमरी गावात कलाकेंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती. तक्रार दाखल होताच आयपीएस पंकज कुमावत यांच्यासह सपोनि सुरेखा धस यांच्या पथकाने या ठिकाणी छापा मारला.
या केलेल्या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या 1 पीडित अल्पवयीन मुलीसह पाच अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. तर याप्रकरणी उबाठा जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदेंसह 36 जणांवर बीडच्या केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यावेळी डीजेच्या तालावर रात्री 2 वाजता काही महिला, मुली नाचत असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर या ठिकाणी दारू, गुटखा, वापरलेले कंडोम देखील आढळून आले आहेत. पोलिसांनी येथील महिला, मुलींचा जबाब घेतला असता त्यामध्ये 12 वर्ष 9 महिन्याची असणाऱ्या अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्याचं उघडकीस आलं.