शैक्षणिक

नेट परीक्षेत भार्गवी रजनीश बार्नबस यांचे यश ; तिला परिक्षेत 99.25 % परसेंटाइल

Spread the love

नगर – राष्ट्रीय परीक्षा एजेंसी व विश्‍वविद्यालय अनुदान आयोग यांच्या वतीने जुन 2024 मध्ये घेण्यात आलेल्या नेट परिक्षेत अहमदनगर महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु.भार्गवी रजनिश बार्नबस हि नेट परीक्षेत उत्तीर्ण झाली. तिला या परिक्षेत 99.25% परसेंटाइल मिळाले आहे. तीने पहिल्याच प्रयत्नांत हे यश मिळवले.

या यशाबद्दल अहमदनगर महाविद्यालयाचे वतीने तिला शुभेच्छा देण्यात आल्या.  प्रख्यात शिक्षणतज्ञ प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस व डॉ.स्वाती बार्नबस  यांची ती कन्या आहे. तिने बी.ए.पर्यंतच शिक्षण अहमदनगर महाविद्यालयात पुर्ण केले. ती अहमदनगर महाविद्यालयाची इंग्रजी विभातुन वर्ष 2022 साठी युव्हर्नसिटी टॉपर आहे. एम.ए. इंग्लिश तिने फर्ग्युसन कॉलेज मध्ये पुर्ण केले आहे.  नुकत्याच झालेल्या सेट परिक्षेतही तिने पहिल्याच प्रयत्नांत यश मिळवले होते.  या यशाबद्दल तिचे महाविद्यातील सर्व प्राध्यापकांनी व विद्यार्थींनी अभिनंदन केले.

 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close