नेर नगर परिषदेवर प्रशासकीय राज,
4 जानेवारी 2019 ला आली होती पदाधिकारी यांची निवड.
नेर :- नवनाथ दरोई
नेर नगर परिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ हा 4 जानेवारी 2024 ला संपुष्टात आला.राज्यांतील संपलेल्या अनेक महानगरपालिका नगरपालिका मध्ये निवडणुका अभावी प्रशासकीय राज आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, दारव्हा, आर्णी,दिग्रस, पुसद, उमरखेड, घाटंजी, वणी या शहराचा समावेश आहे. आता 5 जानेवारीपासून नेर नगर परिषद मध्ये प्रशासकीयराज लागू होणार आहे.नेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा, नगरसेवक पदासाठी 9 डिसेंबर 2018 रोजी निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीचा निकाल दहा डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये त्या वेळच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष म्हणून सुनिता जयस्वाल विजयी झाल्या. त्या पाठोपाठच शिवसेनेचे नव नगरसेवक निवडून आले. तसेच काँग्रेसचे चार राष्ट्रवादीचे तीन तर दोन अपक्ष उमेदवार या निवडणुकीत विजयी आले. शिवसेनेने नगराध्यक्ष पदासह बहूमत मिळवल्यामुळे 5 जानेवारी 2019 ला नवनियुक्त सदस्यांची सभा घेण्यात आली.या सभेमध्ये उपनगराध्यक्ष पदाच्या निवडिमध्ये पवन जयस्वाल यांना विजय घोषित करण्यात आले. पदाधिकाऱ्यांची सूत्र स्वीकारल्यापासून तर 4 जानेवारीपर्यंत त्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे,अर्थातच नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व नगरसेवकाचा.कार्यकाळ संपुष्टात आला असल्याने आता आजपासून प्रशासकीय राज सुरू झाल.