Uncategorized

तोंड दाबत आणि केस ओढत खोलीत नेले आणि अब्रू लुटली 

Spread the love

मुंबई  / नवप्रहार डेस्क 

               एकटी असलेल्या महिलेचे पाठीमागून येवून तोंड दाबत आणि केस ओढत तिला खोलीत घेऊन जाऊन चाकूच्या धाकावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना नालासोपारा भागातील संतोष भवन येथे घडली आहे. या१प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नालासोपाऱ्यात राहणारी 32 वर्षीय पीडित महिला ही 10 सप्टेंबरला रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास मुलाला बोलवण्यासाठी गेली होती. तेव्हा तिथे आरोपी जितेंद्र यादव उर्फ काटु हा आला. त्याने महिलेच्या डोक्याचे केस पकडले आणि एका हाताने तोंड दाबलं. यानंतर त्याने महिलेला एका गल्लीतून खेचत रूममध्ये नेलं. जितेंद्र आणि दुसरा आरोपोी अवी जैसवाल उर्फ बिल्लूने पीडित महिलेला चाकूचा धाक दाखवला आणि तिच्यावर अत्याचार केले.

हा प्रकार कुणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकीही दोघांनी पीडित महिलेला दिली. यानंतर महिलेने तुळींज पोलीस स्टेशन गाठलं आणि दोन आरोपींविरोधात तक्रार दिली, त्यानंतर पोलिसांनी लगेच तक्रार दाखल केली. पीडित महिलेचे आरोपींसोबत काहीतरी वाद असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close