आता हिरवी मिरची खाणाऱ्यांना नाही तर शेतकऱ्यांना रडवनार

भंडारा / प्रतिनिधी
एरवी नागपूर जिल्ह्याची ओळख असलेली मिरची बाजारात मागणी आणि किंमत असल्याने धान उत्पादक जिल्ह्यात मातीची प्रत पाहता आधुनिक शेतीची कास धरणाऱ्या तंत्रस्नेही शेतकऱ्यांनी भंडारा जिल्ह्यात सुद्धा हिरवी आणि लाल मिरचीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली.
यात काही अंशी फायदा झाल्यामुळे धानाची पारंपारिक शेतीतुन नुकसान जास्त होत असल्याने भात पिकाचे छोटे बांध्या मोडून मिरची लागवड करून मोठ्या प्रमाणात खाजगी सिंचनाचे सोय असणाऱ्या शेतकऱ्यांनी यंदा मिरची लागवडीचे क्षेत्र वाढविले, परंतु पुन्हा निसर्ग जिल्ह्यातील मिरची उत्पादकावर कोपला असून खरीप हंगामातील मिरची चे रोपे कमी -अधिक पावसामुळे खराब हवामानाचा फटका बसल्याने सडून गेली. आज विविध कीटकनाशके, पोषणद्रव्ये, फर्टीलायझर, चा वापर(खर्च ) करून कसे-बसे जगलेली रोपे आणि हातात आलेले मोजके मिरची चे पीक आज तोडण्यासाठी २०० रुपये मजुरी *दर असून ८ ते ९ रुपये किलो ठोक बाजारात खरेदी* केली जात आहे. ज्यावेळी लागवडी पासून हंगाम संपेपर्यंत एकरी १ लक्ष रुपयाचा खर्च होत असल्याने, ७ ते ८ रुपये किलो चा खर्च मिरची तोडण्यापर्यंत होत असल्याने, विक्री चा आजचा दर ९ रुपये किलो होत असल्याने आजची स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांना आता जागृत होऊन आपल्या मालाला भाव मिळवून देण्यासाठी राजश्रय ची गरज असल्याने, शासनाने लक्ष देण्याची, आणि उत्पादकांनी कोनता पक्ष शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेतो याकडे लक्ष देऊन त्यांच्या पाठीशी सुद्धा राहण्याची आजची गरज आहे.