नेहरू नगर भोजापूर येथे बुद्ध जयंती समारोह
भोजापूर /प्रतिनिधी
जगाला अंहिसा आणि शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती दिनाचा कार्यक्रम लोकायत बहुउद्देशीय संस्था, भोजापूर च्या वतीने नेहरू नगर भोजापूर येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला संस्था अध्यक्ष योगेश मेश्राम, प्रभूदास निकोसे यांनी पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित केली. यावेळी मान्यवर व उपस्थितांनी पुष्पांजली वाहून प्रतिमेस त्रिवार अभिवादन केले. यानंतर सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. बोधी वृक्षांचे संवर्धन करून विधीवत पुजा करण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये बुद्ध भिम गीताचे गायन प्रा. डॉ. महेशकुमार भैसारे, महादेव मून, डॉ. दिलीप मेश्राम, डेव्हिड भालाधरे यांनी केले.
याप्रसंगी कार्यक्रमास ग्रा.पं. सदस्य अरविंद बाभूळे, प्राचार्य नरेंद्र गणविर, प्रा. डॉ. विजय गणविर, प्रा. डॉ. पुण्यशिल टेंभूर्णे, संस्था कोषाध्यक्ष ऋषी गोस्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदकिशोर भालाधरे, व्दारका भैसारे, अस्मिता धारगावे, स्नेहलता मडामे, राहूल दहीवले, देवेंद्र धारगावे, दिपक मेश्राम, विनोद कोल्हे, रत्नघोष भालाधरे, रुपलता गणविर, सुजाता गोस्वामी, राखी रंगारी, चंदा लांजेवार, अश्विनी बाभूळे, सपना मेश्राम, कल्पना नागवंशी, योगेश बोरकर, मार्कंड मेश्राम, दिपक मेश्राम, सुबोध मेश्राम, कमलेश उके, प्रमोदिनी भालाधरे, ज्योत्सना मेश्राम, शिला मेश्राम, जोगेंद्र मेश्राम, अश्विनी भैसारे, प्रदिप चिमणकर, राहूल कठाणे, कविता जुगनायके, देवराम जुगनायके, काजल डुंभरे उपस्थित होते. या कार्यक्रमास आयुषी पॅरॉमेडीकल कॉलेज भोजापूर येथील शिक्षक, विद्यार्थी, परिसरातील नागरिक व बौद्ध उपासक व उपासिका प्रामुख्याने उपस्थित होते. अंश बोरकर, आदित्य गणविर, प्रिंसी भैसारे, क्षितिजा गोस्वामी, निसर्गा गोस्वामी, अंश भैसारे, रूतूजा गणविर, अदिती धारगावे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन नरेंद्र गणविर यांनी केले. अल्पोपहार व खीरदाना नंतर कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.