चांदुर रेल्वे / प्रकाश रंगारी
राज्यातील शेतकरी, शेतमजूर युवा बेरोजगार यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा काढली आहे. यात्रेदरम्यान ते राज्याचा दौरा करणार असून शेतकरी, शेतमजूर आणि युवा बेरोजगार यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.
नांदगाव खंडेश्वर येथील कार्यक्रन आटपून ते चांदुर रेल्वे साठी निघाले असता जवळा धोत्रा फाट्यावर त्यांच्या यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी या श्री विशालभाऊ भागवत ,प्रवीणभाऊ चिंचे , आधिमुणी बेंदले, सादिक भाई, सूरज मोडक,स्वप्नील मोडक, आशिष वाघ,सतीश वानखेडे,अन्य कार्यकरते मोठ्या संख्येने उपस्थित होते.