गांधी विद्यालयाचे एनसीसी छात्रसैनिक ड्रिल मध्ये प्रथम
आर्वी / प्रतिनिधी
स्थानिक नगर परिषद गांधी विद्यालयातील एकूण 23 छात्र सैनिक हे सैनिक शाळा ,चंद्रपूर या ठिकाणी दहा दिवसीय वार्षिक एनसीसी शिबिरामध्ये दिनांक 4 जून ते 13 जून पर्यंत सहभागी होऊन अतिशय उत्कृष्ट कामगिरी त्यांनी केलेली आहे.
21 महाराष्ट्र बटालियन एनसीसी वर्धा तर्फे दिनांक 4 जून ते 13 जून कम्बाईन ॲनिमल ट्रेनिंग कॅम्प CATC -604 चे आयोजन सैनिक शाळा चंद्रपूर या ठिकाणी करण्यात आले होते यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर ,वर्धा, नागपूर येथील जवळपास 400 छत्र सैनिक सहभागी झाले होते या दहा दिवसीय वार्षिक शिबिरामध्ये नगरपरिषद गांधी विद्यालयातील 23 विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केलेले यामध्ये बेस्ट कॅडेट चा अवॉर्ड सागर संदीप सरोदे याला मिळाला असून त्याच्या नेतृत्वातील ग्रुपमध्ये एलसीपीएल हितेश शिरपूरकर, रुद्राक्ष दिघडे ,गिरीश डहाके, रुद्र सातपुते, सारंग कोठळकर ,धीरज खेडकर,प्रेम कहारे ,कार्तिकी ईखार,मंथन मंडवे , प्रणय काळे, मयंक चव्हाण ,वैभव चौगुले या विद्यार्थ्यांनी जुनियर डिव्हिजन मधून ड्रिल या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला या सर्वांचे माननीय कमांडिंग ऑफिसर कर्नल समीक घोष यांनी गोल्ड मेडल तसेच प्रमाणपत्र देऊन सन्मान केला त्याचबरोबर टग ऑफ वॉर मध्ये मुलींनी क्रमांक पटकावला तसेच सी पी एल हितेश शिरपूरकर यांने प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. सोबतच भाषण स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. सर्व छात्र सैनिकांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री विश्वेश्वर पायले एनसी सी अधिकारी प्रमोद नागरे,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. दहा दिवसीय या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवा लागतो अतिशय शिस्तबद्ध अशा सैनिकी वातावरणात त्यांना सतत कार्यरत राहावे लागते त्यामधून मिळालेले प्रमाणपत्र त्यांना परीक्षेच्या वेळेला सादर करावे लागते.