विशेष

८२ लाखांचे बक्षीस असलेला नक्षली पत्नीसह पोलीसांच्या ताब्यात 

Spread the love

जबलपूर / नवप्रहार मीडिया 

                     अनेक प्रकरणात पोलिसांना हवा असलेला जहाल नक्षली अशोक रेड्डी उर्फ मुरली उर्फ कुशनाम उर्फ महेश याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.तेलंगणामधून येऊन महाराष्ट्रात तीन दशकांपूर्वी नक्षलवादाचे पाळेमुळे मजबूत करण्याचे काम या नक्षली कमांडर ने केले होते.

                   रेड्डी याने गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांसह मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट क्षेत्रात नक्षलवादाची मुहूर्तमेढ रोवली होती. मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये मध्यप्रदेश एटीएसने अशोक रेड्डी आणि त्याची पत्नी रहमतीला अटक केली आहे. अशोक रेड्डीवर महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये ८२ लाखाचे बक्षीस होते.

महाराष्ट्रासह चार राज्यात ६० गुन्हे आणि ८२ लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षली अशोक रेड्डीला मध्य प्रदेश एटीएसने अटक केली आहे. तो तेलंगणातील गोलकोंडाचा रहिवासी आहे. त्याचबरोबरच त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. ती छत्तीसगडमधील नारायणपूर येथील रहिवासी आहे. दोघे जबलपूरला आल्याची माहिती गुप्तचरांकडून मिळाली होती.

रेड्डी पती-पत्नी जबलपूरमधील रुग्णालयात आल्याची माहिती मिळताच एटीएसच्या पथकाने रुग्णालयात छापा टाकून अशोक रेड्डी आणि रहमती यांना पकडले. एटीएसच्या म्हणण्यानुसार, अशोक रेड्डी हा सीपीआय-माओवादीच्या दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य आहे. रहमती बस्तरच्या उत्तर भागात नक्षलवाद्यांसाठी प्रचाराचे काम करत असे. माओवादी साहित्य, पत्रिका इत्यादी छापण्याची जबाबदारीही त्याच्यावर आहे.

महाराष्ट्रात गडचिरोली आणि गोंदियात त्याच्यावर १९ गुन्हे दाखल आहे. परंतु त्यातून पुराव्या अभावी सुटला. यापूर्वी नागपुरला २००७ मध्ये दीक्षाभूमीजवळ सापडला होता. त्यानंतर २०१३ पर्यत जेलमध्ये होता. नंतर गोंदीया आणि गडचिरोली ऐवजी मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये सक्रिय होता. त्याच्या चौकशीसाठी नागपूर एएनओचे एक पथक जबलपूरला रवाना झाले आहे.

एटीएसच्या म्हणण्यानुसार, अशोक रेड्डी याच्यावर चार राज्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दंगल, पोलिसांवर हल्ला, अपहरण, दरोडा, जाळपोळ, शस्त्र कायदा आणि स्फोटक कायदा असे एकूण ६० गुन्हे दाखल आहेत. अशोक रेड्डी तेलंगणा आणि छत्तीसगडच्या भागात नक्षलवादी कारवाया करत असे. मध्य प्रदेशात नक्षलवाद्यांचे जाळे मजबूत करून त्यात लोकांना सहभागी करून घेण्यात अशोक रेड्डी यांचाही हात होता. अशोक रेड्डी आणि रहमती यांची चौकशी केल्यानंतर एटीएस अधिकारी त्यांना आणि त्यांच्या साथीदारांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close