क्राइम
कर्ज मिळवून देण्याचा नावावर महिलेची 93 हजारांनी फसवणूक
पोलिसात तक्रार ; कारवाईकडे नजरा
भंडारा / प्रतिनिधी
व्यवसायासाठी बँकेतून कर्ज मिळवून देण्याचा नावावर महिले कडून 93 हजार रुपये उकळल्याचा प्रकार शहरात घडला आहे. अनेक दिवस वाट बघून देखील कर्ज मिळत नसल्याने कंटाळलेल्या त्या महिलेने दिलेली रक्कम परत करण्यासाठी तगादा लावला असता त्या इसमाने त्यांचा फोन उचलणे बंद केले. फसगत झाल्याचे लक्षात येताच महिलेने भंडारा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारकर्ते महिला सौ. वैशाली निरंजन आठवले यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारी नुसार तिचे शहरात मेडिकल दुकान आहे. व्यवसायात रक्कम कमी पडत असल्याने तिने कर्जासाठी प्रयत्न सुरू केले होते. दरम्यान तिची भेट मौदा जी नागपूर येथील चंद्रशेखर अंबिलडुके यांच्या सोबत झाली.त्याने वैशाली यांना तो डीएसए ( कर्ज मिळवून देणारा एजंट) असून त्यांना कर्ज मिळवून देऊ शकतो. तो स्वतः डीएसए असल्याने त्याने अनेक लोकांना कर्ज मिळवून दिले आहे. विशाली यांना दुकानात औषधाचा स्टॉक भरण्यासाठी रकमेची आवश्यकता असल्याने ती त्याच्या बोलबच्चन मध्ये आली आणि अंबिलडुके यांच्याकडे कर्ज मिळवून देण्यासाठी विनंती केली.
कर्ज मिळवून देण्यासाठी अंबिलडुके याने त्यांच्या कडून दि. 3/10/2022 रोजी 100000 /- , 3/10 /22 7000/- , 11/10 10000/- , 11/10- 10000 /- आणि 14/10/22 रोजी 14000/- असे ऐकून असे ऐकून 51000 /- आणि त्याने संगीतल्या प्रमाणे 42000 /- हजार नगदी असे ऐकून 93 हजार रुपये दिले. पण काही कालावधी लोटून देखील कर्ज मिळण्याचे कुठलेही लक्षण दिसत नसल्याने त्यांनी अंबिलडुले यांच्या कडे कर्ज किंवा रक्कम परतीसाठी तगादा लावला असता. त्याने त्यांचे फोन उचलणे बंद केले.
अंबिलडुके यांच्या नियतीत खोट आल्याचे समजताच वैशाली यांनी पोलीस स्टेशन भंडारा येथे या बाबत तक्रार दाखल केली. पोलीस आंबिलडुके यांच्यावर काय कारवाई करतात याकडे जनतेच्या नजरा लागल्या आहेत.
वैशाली कडे आहेत सबळ पुरावे – वैशाली यांनी अंबीलडुके यांना ऑनलाईन पेमेंट केल्याने त्यांच्याकडे या गोष्टीचे सबळ पुरावे आहेत. या प्रकरणात त्वरित कारवाई होणे आवश्यक झाले आहे. पण नेहमी प्रमाणे पोलिसांकडून या प्रकरणात सुद्धा दिरंगाई केल्या जात आहे.