हटके

नव्या कोऱ्या बुलेटने बघता बघता घेतला पेट 

Spread the love

भर दुपारी पुण्याच्या रस्त्यावर बघ्यांची गर्दी

पुणे / नवप्रहार मीडिया 

                सध्या तरुणच काय तर  माध्यवयीन लोकांच्या मनात बुलेट बद्दल एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. ही गाडी आपल्याकडे हवी अशी जवळपास संगळ्यांचीच ईच्छा असते.काही लोक ती पूर्ण करण्यासाठी कर्ज घेतात. तर काही लोक त्यांना मिळणाऱ्या पॉकेट मनी तुन ती खरेदी करतात.ईतक्या मेहनतीने घेतलेल्या या वाहनाला साधा ओरफडा देखील पडू नये असे सगळ्यांना वाटते,.पण सगळी काळजी घेऊन देखील आपली बुलेट जर धो धो करत जळायला लागली तर ? असाच प्रसंग एका तरुणावर ओढवला. या तरुणाच्या नव्या कोऱ्या बुलेटने अचानक भर रस्त्यावर पेट घेतला.

 आतापर्यंत आतापर्यंत आपण अनेक चारचाकी गाड्यांना, इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याच्या घटना पाहिल्या आहेत. पण बुलेटला लागलेली आग ही दुर्मिळ घटना आहे. पुण्यात भर दुपारीएका नव्या कोऱ्या बुलेटला भीषण आग लागली. याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय.

बुलेटला आग लागल्यानंतर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिथं उपस्थित असलेले लोकसुद्धा याबाबत आश्चर्य व्यक्त करत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गाडीची पेट्रोल टाकी फुटल्याचं नंतर दिसून आलं. बुलेटला दुपारच्या भर उन्हात आग लागल्यामुळे आजूबाजूची वाहनेही लांब गेली. तर भररस्त्यात घडलेल्या घटनेने वाहनचालकांनी काही वेळ आपली वाहने थांबविली होती. दरम्यान यावेळी बुलेटचा मालक आणि काही लोक टँकरमधून पाणी बुलेटवर टाकत आहेत. तरीही आग काही आटोक्यात येत नाहीये. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी गाडीला लागलेली आग आटोक्यात आणली. हा प्रकार पाहून लोक घाबरले. आणि सर्वत्र एकच गोंधळ माजला. दरम्यान नवीकोरी बुलेट फुटली तरी कशी? हा एकच प्रश्न सर्वांना पडला आहे.

हा व्हिडीओ @suraj_modi या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे पुणेकरांनो वाहन चालवताना जरुर काळजी घ्या.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close