रामपुर येथिल उपक्रमशील शिक्षक राजेंद्र गोबाडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान.
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामपूर तालुका घाटंजी येथील उपक्रमशील शिक्षक श्री. राजेंद्र नारायणराव गोबाडे यांना नुकताच अग्निपंख शैक्षणिक समूह यांच्या तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय नवोपक्रमशील शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. माहूर जिल्हा नांदेड येथे आयोजित एका भव्य समारंभात यवतमाळ जिल्ह्याचे माजी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रमोद सुर्यवंशी,डाएट चे प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे,मंजुषा ढाकरे सामाजिक कार्यकर्त्या छ. संभाजीनगर, अर्चना मेहरे, गजानन गोपेवाड राज्य समन्वयक यांचे प्रमुख उपस्थित हा पुरस्कार करण्यात आला.
राजेंद्र गोबाडे यांनी त्यांच्या शिक्षकी सेवाकाळात राबविलेल्या शाळा माझी गावात,पाणी फाउंडेशन, शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनी, तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षा अभ्यासकेंद्र,झेप व बाला उपक्रम,माझा अभ्यास कट्टा, उत्कृष्ट परसबाग,आदर्शगाव योजना,स्वच्छता अभियान, स्मार्टग्राम,विविध सहशालेय स्पर्धा, वृक्ष लागवड आणि संवर्धन खेळ,क्रीडा स्पर्धेत विद्यार्थी सहभाग या विविध शैक्षणिक तसेच सामाजिक उपक्रमांची दखल घेऊन या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या यशाबद्दल गटविकास अधिकारी श्री.महेशजी ढोले, गटशिक्षणाधिकारी सुधाकर वांढरे,विस्तार अधिकारी सुनील बोंडे, माजी केंद्रप्रमुख मोहनराव ढवळे, रविंद्र उमाटे,विठ्ठलराव राठोड,कुलदिप डंभारे,संजय पडलवार,केंद्रप्रमुख चंद्रकांत मुनेश्वर,अतुल वानखडे यांनी अभिनंदन केले .
0000000000000