क्राइम

नशेच्या गोळ्या देऊन नवऱ्याने केले कांड 

Spread the love

एटा ( युपी ) / नवप्रहार डेस्क

              बायकोला नशेच्या गोळ्या देऊन नवऱ्याने भलतेच कांड केल्याने बायकोने ठाण्यात धाव घेत पती विरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

युपी मधील  एटा जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडलाय. पत्नीने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्या महिलेची आपबीती ऐकून पोलिसही  हैराण झाले. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपास हाती घेतला असून कसून चौकशी सुरु केली आहे.

एटा जिल्ह्यातील बागलवाला ठाण्यात  एका महिलेनं सहा जणांविरोधात रिपोर्ट दाखल केलाय. हुंड्याची मागणी पूर्ण न केल्यामुळे त्रास देत असल्याचे आरोप तिने केलाय. त्याशिवाय नवऱ्याने नशेच्या गोळ्या देऊन बळजबरीने अनैसर्गिक संबंध ठेवले, त्यामुळे प्रकृती खालावल्याचा आरोपही केलाय. त्या महिलेची आपबीती ऐकल्यानंतर पोलिसही हैराण झाले. धक्कादायक बाब म्हणजे, ती महिला मध्यरात्रीच पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी पोहचली होती.

३० लाख रुपये खर्च करुन कुटुंबियांनी चार जुलै २०२२ रोजी माझं लग्न लावलं. पण लग्नानंतर सासरच्या मंडळींनी आणखी हुंड्याची मागणी केली. एख फ्लॅट आणि १५ लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती. माहेरच्या लोकांनी याबाबत नकार दिला, त्यावेळी मला त्रास देण्यास सुरुवात केली. मानसिक आणि शारीरिक पद्धतीने मला त्रास देण्यात आला. दोन महिन्यापूर्वी माझा गर्भपात केले. नशेच्या गोळ्या देऊन नवऱ्याने अनेकदा माझ्यासोबत अनैसर्गिक संबंध ठेवला. इतकेच नाही तर दीर माझ्यासोबत उद्धटपणे वागतो.

सहा जुलै रोजी पतीने अमानवी कृत्य केले. रात्री जीवे मारण्याच्या इराद्याने मारहाण केली. त्याशिवाय मध्यरात्री बळजबरी मला माहेरी सोडलं. त्यावेळी कुटुंबियांनी जाब विचारला. त्यावर पतीने हुंड्याची मागणी केली. कुटुंबियांनी असमर्थता दर्शवल्यानंतर तो निघून गेला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close