नवविधा भक्तीत सर्वश्रेष्ठ दास्य भक्ती- ह.भ.प. मोहन रायकर, मुंबई
कीर्तन पुष्प ४ थे
कीर्तन महोत्सव आयोजन समिती यवतमाळ तर्पेâ भव्य कीर्तन महात्सव वर्ष १७ वे
यवतमाळ (का.प्र.)
श्रवणं, कीर्तनं, विष्णोः स्मरण, पाद सेवनम्, अर्चनं, वंदनं, दास्य, सख्य, आणि आत्मनिवेदन हे भक्तीचे नवविधा प्रकार नम्रता, सेवाभाव, निष्ठा वचनबद्दता आणि कर्तव्य दक्षता हे पाचे गुण ज्या भक्तीमध्ये आढळतात. ती दास्य भक्ती. आणि दास्यभक्तीच्या आदर्शतेचे उदाहरण द्यायचे झाल्यास प्रथम नाम येते ते… दास रामाचा हनुमंत आणि रामदास समर्थ .ज्यांनी आपल्या एकमेव इष्ट देवलेलाच सर्वेसर्वा माणले. त्या मध्ये हनुमंतांनी प्रत्यक्ष रामपूजला आणि समर्थ रामदासांनी राम भजला. हे दोघेही बलशाली असून सुद्धा त्यांना आपल्या बालाचा कधीही अहंकार झाला नाही. इतर सात भक्तीमध्ये कुठेतरी अहंकाराच्या लेश असतोच परंतु दास्य भक्तीत अहंकाराचा लवलेश नसतो. आणि म्हणून नवविधा भक्तीत सर्वश्रेष्ठ भक्ती दास्यभक्ती’ असे प्रतिपादन ह.भ.प. मोहन महाराज रायकर, मुंबई यांनी केले. कीर्तन महोत्सव आयोजन समिती द्वारा आयोजीत कीर्तन महोत्सवात चतुर्थ कीर्तन पुष्प गुंफताना निरूपणासाठी ‘सदादेव काजी झिजे देह ज्याचा। सदा रामनामे वदे नित्य साचा ।।’’ हा समर्थ रामदासांचा श्लोक घेतला. याचा दृष्टांत देतांना त्यांनी नागपूर येथील बाबाजी पंडीत यांचा अनुभव कथन केला. प्रवेश परिक्षेत अनुत्तिर्ण झालेल्या बाबाजींना आता काय आयुष्यभर लोकांच्या घरी पाणी भरणार का? हा प्रश्न त्यांच्या वडीलांनी विचारला, आणि काय आश्चर्य बाबाजींनी घर सोडलं आणि भटकत भटकत अमरावती येथे ज्ञानेश कन्या प्रज्ञाचक्षू गुलाबराव बाबाच्या आश्रमात प्रवेश केला. आश्रमात पाण्याच्या दुर्भिष्णा मुळे समस्त भक्तगण त्रस्त होते. जेव्हा गुलाबराव बाबांची भेट झाली तेंव्हा बाबाजीने वंदन केले व मला सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती केली तेव्हा बाबा हसत हसत म्हणाले..; तू काय पाणी भरणार? तेव्हा बाबाजी पंडीतांनी विचार केला की, लोकाच्या घरी पाणी भरण्यापेक्षा संतांच्या द्वारी पाणी भरणं काय वाईट. नाथांच्या घरी प्रत्यक्ष भगवंतानी पाणी भरलेच की. आणि अखंड रामनाम घेत बाबाजीं पंडीतांची पाणी भरण्याची दास्य भक्ती सुरु झाली. म्हणतात ना..: सद्गुरु सारिखा असता पाठीराखा । इतरांची लेखा कोण करी । आपणा सारिखे करीती तात्काळ । नाही काळ वेळ तया लागी।। आणि काय आश्चर्य अवघ्या काही दिवसातच बाबाजीची दास्य सेवा फळास आली आणि बाबाजी बाबाचे उत्तराधिकारी झाले. त्रिवक्रा दासीने केवळ एक वेळा मथुरेत भगवान श्रीकृष्णाची चंदन लेप लावून सेवा केली असता भगवान श्रीकृष्णांनी तिचे व्यंग क्षणार्धात नाहीसे केले. असा दास्य भक्तीचा महिमा अनेक दृष्टांत, दिंडी, साकी वृत्त, अभंग या द्वारे बुवांनी अपना पुर्वारंग अतिशय प्रभावीपणे सादर केला. महाराजाचे तथा संवादिनीवादक गंगाधररावदेव तबला वादक सचिन वालगुंजे व सौरभ देवधर यांचे स्वागत वसंतराव बेडेकर यांनी केले. दीप प्रज्वलन सुरेश वैâपिल्यवार, अरुण भिसे, डॉ. सुशील बत्तलवार यांनी केले. सूत्र संचालन मधुरा वेळूकर यांनी प्रभावी व समर्पकपणे केले.
उत्तरार्धात सर्वांनाच माहित असलेले रूक्मिणी कृष्ण स्वयंवर आगळ्या वेगळ्यापणे सादर करून श्रोतृवृंदांना मंत्रमुग्ध केले हे या कीर्तनाचे वैशिष्ट म्हणवे लागेल. स्वे स्वे कर्मव्याभिरत संसिद्धि लभते नरः’, असा संदेश देऊन त्यांनी आपल्या कीर्तनाची सांगता केली, आरतीचे यजमानपद अल्का पजगाडे, मंगला देशपांडे, वृंदाताई देशमुख, रेखा अमरावतकर, वैशाली शिंदे सरोळकर यांनी भूषविले
ल