हटके

तिला अन्य व्यक्ती सोबत किस करताना पाहून भडकला नवरा आणि ….. 

Spread the love
 

नवी दिल्ली  / नवप्रहार मीडिया 

सोशल मीडिया असं माध्यम आहे जिथे सर्वच प्रकारच्या गोष्टी पहायला मिळतात. महत्त्वाची माहिती, मनोरंजन, अपडेट अशा सर्व प्रकारच्या गोष्टी सोशल मीडियावर उपलब्ध असतात आणि लोक त्यांच्या पुरेपुर फायदा घेतात. मनोरंजनाच्या हेतुने अनेक व्हिडीओ बनवले जातात आणि सोशल मीडियावर शेअर केले जातात जे पाहून सर्वच पोट धरून हसता. असे व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.

एक महिला दुसऱ्याच व्यक्तीला किस करतेय हे पाहून नवरा भडकतो आणि तो पळत येऊल त्या व्यक्तीला मारतो. मात्र पुढे जे घडतं ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. काहीच वेळात व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला.
व्हायरल होत असलेल्या या मजेशीर व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला एका व्यक्तीला किस करतेय. तेवढ्यात तिचा नवरा येतो आणि हे पाहून त्याला राग अनावर होतो. तो पळत येऊन त्या व्यक्तीला मारतो. त्यानंतर बायको त्याला दाखवते की तो कोणी व्यक्ती नसून एक डमी आहे. आणि मग हे सगळं दृश्य कॅमेऱ्यात कैद केलं जातंय हे त्याला समजतं. हे पाहून त्याचा राग शांत होतो आणि तो ही हसायला लागतो.
व्हायरल होत असलेला हा व्हिजीओ मनोरंजनाच्या दृष्टीने बनवल्याचं पहायला मिळतंय. @HumansNoContext नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 25 सेकंदांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलीच खळबळ माजवताना पहायला मिळाला. व्हिडीओवर मजेशीर कमेंट येताना दिसत आहे. पत्नी आपल्यासोबत असं काही करेल असा कोणताच पती विचार करु शकत नाही, असं नेटकरी कमेंट करत आहेत. काहींनी म्हटलं हे पाहून पोट दुखेपर्यंत हसलो. असा निरनिराळ्या रिअॅक्शन नेटकरी व्हिडीओवर करतायेत.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close