स्वभाव आडवा आला आणि बिबट्याची झाली फजिती
मनुष्याप्रमाणे प्राण्यांचा स्वभाव देखील प्रेमळ आणि हिंस्त्र असतो. जसे मनुष्याला त्याच्या स्वभावामुळे बरेवाईट परिणाम भोगावे लागतात. तसेच प्राण्यांना देखील भोगावे लागतात. असाच प्रकार बिबट्या सोबत घडला आहे. चला तर जाणून घेऊ काय आहे प्रकरण.
समाजमाध्यमांवर नेहमीच प्राण्यांचे विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात अनेकदा प्राण्यांचे मजेशीर तर कधी थरारक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. हे व्हिडीओ क्षणात लाखो व्ह्यूज मिळवतात. परंतु यातील काही व्हिडीओ असे असतात जे आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचे असतात. अनेकदा जंगलातील काही हिंस्र प्राणी शिकारीच्या शोधात मानवी वस्तीमध्येही शिरकाव करतात. या व्हिडीओतील बिबट्याही मानवी वस्तीत शिरकाव करतो. पण, यावेळी त्याच्याबरोबर असं काही घडतं जे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका रस्त्यावर गड्यांची वर्दळ सुरू असून यावेळी एक बिबट्या एका कारच्या पुढच्या ग्रिलमध्ये अडकतो. गाडीच्या ग्रिलमध्ये त्याचे शेपूट अडकते ते काढण्यासाठी तो अनेक प्रयत्न करताना दिसतो. पण काही केल्या त्याची त्यातून सुटका होत नाही. यावेळी त्या कारचा मालकही भितीमुळे गाडी बाहेर येऊन त्याची मदत करत नाही. शिवाय रस्त्यावरील इतर लोकही बिबट्याच्या मदतीसाठी धावून येत नाहीत.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @wildanimalearth98 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत जवळपास ३२ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर एक लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. शिवाय यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “तो हल्ला करेल म्हणून कोणीही त्याची मदत करणार नाही”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “बिचाऱ्याच्या मदतीला कोणीही आलं नाही”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “थरारक व्हिडीओ”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, “खूपच वाईट घटना.”