क्राइम
राष्ट्रवादीच्या नेत्याकडून नोकरीचे आमिष देत अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप

मागील पाच वर्षांपासून सुरू होता हा घृणास्पद प्रकरण
वर्धा / विशेष प्रतिनिधी
एकीकडे देशात जागतिक महिला दिन साजरा होत आहे. नेतेमंडळी महिलांच्या सुरक्षिततेबाबत मोठ मोठाली भाषणे देत आहेत. महिलांच्या आजादी ला घेऊन नागरिकांना उपदेश देत आहेत. अश्यातच गांधी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्धा येथून एक धक्कादायक आणि घृणास्पद घटना उघड झाली आहे. येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सिनिअर नेत्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवाकर गमे असे या आरोपीचे नाव असून पुलगाव पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पुलगाव पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत आणि इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जागतिक महिला दिन’ साजरा करत असताना, महाराष्ट्राच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राला सुन्न करणारी ही एक अत्यंत घृणास्पद आणि संतापजनक घटना आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित मुलगी अवघी 17 वर्षांची असताना आरोपीने तिला नोकरीचे आमिष दाखवत गेल्या सुमारे पाच वर्षांपासून तिचे सातत्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीचे पीडित मुलीच्या कुटुंबाशी जवळचे संबंध असल्याची माहितीही समोर आली आहे. तसेच तीन दिवसांपूर्वी आरोपीने पीडितेला अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून छळ केल्याचा आरोप आहे. यामुळे त्रस्त झालेल्या पीडित मुलीने अखेर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
तक्रार मिळताच पुलगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत 7 मार्चच्या सायंकाळी आरोपी दिवाकर गमे याला अटक केली. पोलिसांनी आरोपीचा मोबाईलही जप्त केला असून त्यातून आणखी धक्कादायक पुरावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, आरोपी हा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाशी संबंधित एका दिग्गज नेत्याचा निकटवर्तीय असल्याची माहिती समोर येत असून या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, आरोपी हा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाशी संबंधित एका दिग्गज नेत्याचा निकटवर्तीय असल्याची माहिती समोर येत असून या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.



