खेळ व क्रीडा

राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धा विजेत्या महाराष्ट्र संघात अकोल्याची कन्या फिजा सय्यद

Spread the love

 

अकोले ( प्रतिनिधी ) १६ व्या वरिष्ठ पश्चिम विभागीय राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धा मध्ये महाराष्ट्र संघास अजिंक्यपद मिळाले आहे. या संघात अकोले ची कन्या फिजा फत्तू सय्यद हिने उत्कृष्ठ कामगिरी केली आहे.
उत्तर प्रदेशातील मेरठ येथे ६ ते ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या १६ व्या वरिष्ठ पश्चिम विभागीय राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धा संपन्न झाल्या.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याची कन्या फिजा सय्यद हिने अतिशय चमकदार कामगिरी केली आहे. फिजा सय्यद हि आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू आहे. तालुक्यापासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत विविध स्पर्धांमध्ये यशस्वीरित्या सहभागी झाल्या आहेत. २०१७ च्या २४ व्या सिनियर महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप मध्ये मुंबई उपविजेता संघात सहभागी . २०१८ मध्ये औरंगाबाद (एम एच) येथे झालेल्या २४ व्या ज्युनियर राष्ट्रीय महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले. ३६ वी ज्युनियर राष्ट्रीय सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप २०१८-२०१९ आंध्र प्रदेश येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यात महाराष्ट्र संघात मोठी भूमिका बजावली. २०१८ मध्ये १९ वर्षांखालील भारतीय संघाने सातवी आशियाई ज्युनियर महिला सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप जिंकली त्या संघात सहभाग, फिलीपिन्समध्ये झालेल्या स्पर्धेत भारतीय संघासाठी चांगली कामगिरी केली. २०२२ मध्ये थायलंडमधील पटाया येथे झालेल्या आशियाई महिला विद्यापीठ सॉफ्टबॉल चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाची उत्कृष्ट कामगिरीत सहभागी, २०२२-२३ मध्ये वरिष्ठ राज्य सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. १४ व्या फेडरेशन कप राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत २०२३-२४ मध्ये सुवर्णपदक जिंकले. ४४ व्या वरिष्ठ राष्ट्रीय सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेत २०२२-२३ मध्ये सुवर्णपदक जिंकले.
अकोले सारख्या दुर्गम, आदिवासी भागातील फिजा सय्यद हिचे यश उल्लेखनीय आहे. भाजपा अल्पसंख्याक आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष फत्तूभाई सय्यद यांची कन्या आहे. तिच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close