सामाजिक

वाणाराने उडी घेतल्याने भिंत कोसळून महिला जखमी

Spread the love

मोहाडी. / प्रतिनिधी

मोहाडी तालुक्यातील करडी येथील इंदिरा नगर येथे सेलोकर यांच्या भिंतीवर बंदर कूडल्याने भिंत कोसळली त्या भिंतीत मिरा गाढवे दबली गंभीर जखमी अवस्थेत भंडारा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मोहाडी तालुक्यातील करडी येथे मोठ्या प्रमाणात बंदरांचा उपद्रव आहे.या बंदरांचा बंदोबस्त करावा असे वन विभागास सांगून सुद्धा त्याचा बंदोबस्त करीत नाही व बंदरा मुळे गावात असलेली झाडे कापून टाकली.घरी कोणताच भाजी पाला फळ झाडे नाहीत स्लॅब वर कड धान्य वाळू टाकू शकत नाही. कवेलूक्या घरांची दयनीय अवस्था आहे.घरा घरावर ताडपत्री टाकलेली दिसते. वणराना मरलेतर वन विभाग गुन्हा दाखल करते.मग लोकांनी काय करावे?
दि.30 मार्च रोजी करडी येथील इंदिरा नगर येथे कृष्णा गाढवे यांच्या घरी दुपारी बारा वाजता बंदर आले त्यांना पळविण्याचा प्रयत्न मिरा क्रिस्ना गाढवे 50 हिने करत घरा लगत असलेल्या राजेंद्र सेलोकर यांच्या घरा जवळ जाताच बंदर भीतीवर कुदला त्या मुळे भित थेट मिरा गाढवे यांच्या अंगावर पडली त्यात मिरा गाढवे गंभीर जखमी झाली त्या मिरा हीचा उजवा पाय तुटला.डोके फुटले. व शरीराच्या अनेक भागावर मार लागला मिरा गाढवे हिला त्वरित भंडारा येथे खाजगी रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले.असून प्रकृती चीता जनक असल्याचे कळते.
मिरा गाढवे याना त्वरित आर्थिक मदत देऊन बंदरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करडी येथील नागरिक करीत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close