सामाजिक

नशा मुक्ती भारत अभियान निवासी शाळा हिंगनगाव (का) येथे आयोजित

Spread the love
(सामाजिक न्याय और अधिकारीता  मंत्रालय भारत सरकार )
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
समाज कल्याण मार्फत निवासी मुलींची शाळा हिंगनगाव येथे नशा मुक्ती अभियान राबविण्यात आले प्रमुख मार्गदर्शक सामाजिक न्याय विभागा अंतर्गत सरोजताई आवारे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक बोरे व शिक्षक वर्ग यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले ,प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या सरोजताई आवारे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या.  व्यसन म्हणजे काय  ज्या सवयीमुळे  सामाजिक, आर्थिक, मानसिक  यावर विपरीत परिणाम होतो हे माहीत असून सुद्धा त्यावर नियंत्रण न ठेवता  येणे म्हणजे व्यसन होय . सामाजिक बांधिलकी म्हणून नशा मुक्ती अभियान राबविताना एक जबाबदारी म्हणून नशा मुक्ती शपथ घेऊन ते अमलात आणे गरजेचे आहे साध्या आणि सोप्या भाषेत नशा मुक्ती या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तसेच निवासी शाळा येथील मुख्याध्यापक बोरे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले आपल्या सवयीचे व्यसनात बदल होणार नाही यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे तसेच ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेश्राम सर यांनी केले तर आभार प्रदर्शन चौधरी मॅडम यांनी केले  कार्यक्रमाला उपस्थित सामाजिक न्याय विभाग अंतर्गत सरोजताई आवारे, मुख्याध्यापक बोरे सर, तिरपुडे सर, लोखंडे सर, चौधरी मॅडम , वाकेकर मॅडम ,विवेक इंगळे व विद्यार्थ्यांनी. विद्यार्थ्यांनीच्या  माध्यमातून नशा मुक्ती अभियान रॅली काढण्यात आली अशाप्रकारे नशा मुक्ती अभियान राबविण्यात आले.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close