Uncategorized

नार्वेकर १६ आमदारांच्या संदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ? 

Spread the love

मुंबई / नवप्रहार वृत्तसेवा

               मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या पक्षातील १६ आमदारां संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांकडून समजते. 

काही दिवसांपूर्वी राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या दोन्ही आमदारांना नोटीस बजावली होती. या नोटीशीवर उत्तर देण्यासाठी ७ दिवसांचा वेळ देण्यात आला होता. दोन्ही गटाकडून वेगवेगळा दावा सुद्धा करण्यात आला आहे. त्यामुळे आता १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.आता दोन्ही गटाकडून विधानसभा अध्यक्षांकडे उत्तर दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या (Eknath Shinde) ४० आणि उद्धव ठाकरे गटाच्या १४ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या नोटीसला उत्तर दिल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, आम्ही १४ आमदार खरी शिवसेना आहोत, असा दावा ठाकरे गटाकडून  करण्यात आला आहे. ठाकरे गटाने अध्यक्षांकडे २६२ पानांचं उत्तर सादर करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह ४ आमदारांनी पक्षाच्या घटनेचं उल्लंघन केलं आहे.

आता दोन्ही गटांनी लेखी उत्तर सादर केल्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आल्यानंतर आता आमदार अपात्रतेसंदर्भातील कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे.पक्षाची घटना मोडून शिंदे गटाने अनधिकृतरित्या पक्षावर दावा केला. २०१८ मध्ये सुनील प्रभूंचा व्हीप लागू होता. तसेच राजकीय पक्षाचाच व्हीप लागू होणार, कारण सुप्रीम कोर्टाच्या निकालात तसा उल्लेख आहे, असं स्पष्ट उत्तर ठाकरे गटाच्या आमदारांनी दिलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close