जल पर्यटना सह विविध विषयांवर आ. नरेंद्र भोंडेकर यांनी घेतली बैठक
मुख्यमंत्री विद्युत सवलत कृषी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे दिले निर्देश
भंडारा : वैनगंगा नदी वर प्रस्तावित जल पर्यटन विषयावर आज संबंधित विभागाची बैठक आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित असून त्यांनी पर्यटन विभागाचे सचिव डॉ कुलकर्णी यांच्या सह विडीयो कॉन्फारेन्सिंग द्वारे तांत्रिक माहिती जाणून घेत अडचणी दूर करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले. सोबतच बैठकीत गोसे बाधितांचे पुनर्वसन, भंडारा पवनी मार्गाची दुर्दश झाल्याने मार्गाची दुरुस्ती, तालुका क्रीडा संकुल करिता लागणारी भूमी, विद्युत विभागाची मुख्यमंत्री सवलत कृषी योजना सारख्या अन्य विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
उल्लेखनीय आहे कि वैनगंगा नदी वर गोसे खुर्द प्रकल्प झाल्या नंतर भंडारा शहर पर्यंत नदी पाण्याने तुडुंब भरलेली असते. ज्या मुले या नदी ला समुद्राचे स्वरूप मिळालेले दिसते. नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भंडाऱ्याच्या दौऱ्यात या नदी वर मोठे जल पर्यटन उभारले जाणार असल्याची घोषणा केली. या घोषणे नंतर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आनंद बघायला मिळत आहे. आता या जल पर्यटनाच्या नियोजनाला सुरुवात झाली असून यात येणाऱ्या अडचणींना लक्ष्यात घेता आ. नरेंद्र भोंडेकर यांनी आज जिल्हाधिकार योगेश कुंभेजकर यांच्या सभा गृहात सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली. या बैठकीत भंडारा शहराच्या बाय पास मार्गा करिता कोरंभी येथे नदीवर निर्माण करण्यात येणाऱ्या पुलाची उंची, क्रुझ किंवा बोटींना फिरण्या करिता मार्ग, जल पर्यटन मार्गाची लांबी या व्यतिरिक्त अन्य सुविधा या बाबींवर चर्चा करण्यात आली. बैठकी दरम्यान पर्यटन विभागाचे सचिव डॉ कुलकर्णी यांनी विडीयो कॉन्फरेन्सिंग द्वारे जल पर्यटन बद्दल माहिती दिली. ज्या आधारे प्रस्तावावर पुढे काम सुरु करण्याचे निर्देश आ. भोंडेकर यांनी विभाग प्रमुखांना दिले. बैठकी दरम्यान तालुका क्रीडा संकुल करिता लागणारी दोन एकर भूमी करिता उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांच्याशी चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांनी समस्या मार्गी लावण्याचे निर्देश दिले. याच प्रमाणे विद्युत विभागाच्या अधिकार्यांना मुख्यमंत्री सवलत कृषी योजना हि प्रत्येक शेतकऱ्यां पर्यंत पोहचवून याच लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना करून देणे, वन विभाग अंतर्गत येणाऱ्या गावांना २४ तास वीज पुरवठा देणे, कोका क्षेत्र करिता स्वतंत्र फिडर उभारण्याचे निर्देश देत या करिता विद्युत विभाग व वन विभागच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून ताबडतोब पूर्तता करण्याची सूचना आ. भोंडेकर यांनी दिली.
*भंडारा पवनी मार्गा ची दुरुस्तीचे दिले निर्देश*
बैठकी दरम्यान आ. भोंडेकर यांनी भंडारा पवनी मार्गावरील वन विभाग मुळे अडलेल्या रस्त्याची दुर्दशा झाल्याचे विशेषतः निदर्शनास आणून दिले. या मार्गावर होत असलेल्या दुर्घटना बद्दल खंत व्यक्त केला आणि संबंधित विभागाने वन विभागाची मंजुरी मिळे पर्यंत या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. या करिता ज्या हि कोणत्या हेड मधून निधी देता येईल त्या करिता पाठपुरा करण्याचे हि आश्वासन आ. भोंडेकर यांनी बैठकीत दिले. या बैठकीत सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.