शाशकीय

रामदेव बाबा कंपनी मधील रसायनयुक्त पाणी सोडल्या जाते नाल्यात.

Spread the love

 

प्रदूषण मंडळ झोपेत,

महादुला येथील रामदेव बाबा साल्वंट कंपनीचा प्रकार,

मौदा प्रतिनिधी.

रोजगार निर्मित करायला हवी पण रोजगार निर्मितीच्या नावाखाली कुठल्याही कारखानादाराला नैसर्गिक स्त्रोत खराब करण्याचा अधिकार नाही. मात्र मौदा तालुक्यातील महादुला ( बोरगांव) ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या रामदेव बाबा साल्वंट कंपनीतून दररोज रसायनयुक्त पाणी बाजूच्या नाल्यांमध्ये सोडले जाते. त्यामुळे तालुक्यातील इतर जल स्त्रोत खराब होत आहे. एवढा भयावह प्रकार सुरू असतानाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र झोपेत आहे, यामुळे परिसरातील नागरिकांच्या मनात असंतोष पसरला आहे.
महादुला येथे रामदेव बाबा सालवंट कंपनी कार्यरत आहे. ही कंपनी गावाशेजारी असून कंपनी मधून रोज रसायनिक्त पाणी सोडल्या जात असल्याने आसपासची शेती खराब झाली आहे. वस्तू:त कंपनीच्या संचालक मंडळांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भेटून यापुढे आमच्याकडून प्रदूषण होणार नाही अशी लेखी हमी दिली होती. पण कंपनी संचालक मंडळानी दिलेला शब्द पडला नसल्याने पुन्हा परिस्थिती जैसे थे बनली आहे. आज महादूला परिसरातील शेतकरी कंपनीच्या या रसायनयुक्त पाण्याने फार मोठ्या संकटात सापडले आहेत .त्यांनी अनेकदा परिणामी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली. पण त्यांनी कारवाई केवळ कागदावरच दाखविली आहे. प्रत्यक्ष काहीहीच केले नाही. व स्थानिक प्रशासन सुद्धा कंपनी च्या विरोधात कार्यवाही साठी पुढे येत नसल्याने पाणी कुठे मुरते हा प्रश्न पडला आहे.
रसायनयुक्त पाणी स्वच्छ करून ते बाहेर सोडावे असा नियम सर्वांनाच लागू आहे. मग रामदेव बाबा सालवंट कंपनीला रसायनयुक्त पाणी सोडण्याचा अधिकार दिला कोणी? असा प्रश्न पडला आहे. आज रसायन जलस्त्रोतात मिसळल्याने भुगर्भातील पाणी खराब होत आहेत. पुढे या गावाची परिस्थिती विचित्र झाल्यास याला जबाबदार कंपनीतील संचालक मंडळ राहील असेही बोलल्या जात आहे. या कंपनीच्या विरोधात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा 10 जानेवारी 2022 रोजी जोरदार आंदोलन केले होते. पण त्याच्याही उपयोग झालेला नाही. तेव्हा प्रदूषण मंडळाचे रामबाण तोडगा काढावा अशी विनंती पीडित शेतकऱ्यांनी सुद्धा केली होती.
मागील दोन वर्ष अगोदर कंपनीतील रसायनयुक्त पाणी नाल्यात सोडल्याने नाल्यातील मासोळ्या सुद्धा मृत पावल्या होत्या. तर याबाबत तक्रारी केल्यानंतर कंपनीतील रसायनयुक्त पाणी काही दिवस राष्ट्रीय महामार्गावर सुद्धा मनमानीपणे ट्रॅक्टर द्वारे फेकण्यात आले होते. याकडे कोणीच लक्ष न दिल्यामुळे कंपनीवर कारवाईचा बडगा कुणीच उचलला नसल्यामुळे प्रशासनाला अपयश असल्याचे दिसून आले. आता हे पाणी शेजारी नाल्यात सोडल्या सोडत असल्यामुळे ताबडतोब प्रदूषण मंडळाने व स्थानिक प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close