नंदलाल पाटील कापगते विद्यालयात डॉ. आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा
साकोली / प्रतिनिधी
नंदलाल पाटील कापगते विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय साकोली येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आले.
विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती आर.बी.कापगते यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच उपस्थित विद्यालयातील प्रा.के.जी.लोथे, प्राध्यापिका स्वाती गहाणे, डी.एस. बोरकर, एम. एम. कापगते, डी.डी.तुमसरे इत्यादी मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली.
मुख्याध्यापिका आर. बि. कापगते विद्यार्थ्यांशी हितगुज करताना डॉ. आंबेडकर यांच्या जीवन चरित्र प्रकाश टाकताना म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान हे समता, स्वातंत्र्य ,न्याय, बंधुता या तत्त्वावर आधारित आहे. संविधान हे अत्यंत कष्टातून, प्रचंड त्यागातून निर्माण केले आहे ,भारतीय राज्यघटना जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीसाठी पायाभरणी ठरली असून ही राज्यघटना टिकवून ठेवण्याचे व जतन करण्याचे काम आपण देशातील उज्वल नागरिकांवर अवलंबून आहे, मार्मिक विचार मुख्याध्यापिका यांनी व्यक्त केले.
या दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गीत, भाषणे च्या माध्यमातून डॉ. आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वा विषयी गुणगान करून प्रकाश टाकला तसेच मिडलस्कूल विभागातील विद्यार्थ्यांनी “बालसभेचे” आयोजन करून सुंदर असे कौतुकास्पद सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. व्हि. दिघोरे सर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेकरिता एस.व्ही. कामथे, सोनाली क-हाडे, वेणू लिमजे, आर.एम. मिराशे इत्यादी प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.