नांदगाव नगरपंचायत वर माकप चे देधडक धरणे आंदोलन
गाव नमुना आठ ‘अ ‘ व घरकुल देण्याची प्रमुख मागणी
नांदगाव खंडेश्वर / संदीप अंभोरे
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संधेला 14 ऑगस्ट रोजी नगरपंचायत कार्यालयावर दे धडक धरणे आंदोलन करण्यात आले. नांदगाव खंडेश्वर शहरांमध्ये गेल्या 30-40 वर्षांपासून भोगवटा धारक गावठाण शासकीय जागेत इमला उभारून राहत आहे. भूखंड कायम करून गाव नमुना आठ मिळावा या मागणीला घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने गाव नमुना आठ ‘अ ‘च्या मागणीला 2014 सालापासून सुरुवात केली. आठ ‘अ ‘मिळावा या मागणीला घेऊन पाठपुरावा व सातत्यपूर्ण आंदोलने केली. 10/8/2020 रोजी भूमी अभिलेख कार्यालयाने मोजणी संदर्भातील आदेश पत्र काढले. त्या आदेश पत्रात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नाव आवर्जून घेण्यात आले. नांदगाव खंडेश्वर शहरातील 676 अतिक्रमित भोगवटाधारकांच्या घराची प्रत्यक्ष मोजणी करण्यात आली असून. मोजणी नकाशाची फी 6 लाख 77 हजार रुपयांचा पैसा भरणा करा व गावं नमुना 8 आठ ‘अ’ ‘ द्या, अतिक्रमित धारकांना त्वरित घरकुल द्या, प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुलाचे अनुदान तरी द्या, नवीन घरकुल लाभार्थ्याचे अर्ज निकाली काढून प्रधानमंत्री आवास योजना द्या, गावठाण जागेचा विस्तार करून मागेल त्याला जागा उपलब्ध करून द्या, नगरपंचायत मार्फत स्वच्छता कामे धूवारणी, फवारणी, तडतडीने करा. डम्पिंग ग्राउंड चा प्रश्न त्वरित निकाली काढा, नांदगाव शहराला नियमित पाणीपुरवठा करा या मागणीला घेऊन नगरपंचायत कार्यालयासमोर दे धडक धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉ. श्याम शिंदे, अशोक केसरखाने, राजगुरू शिंदे यांनी केले. मोहसिन शेख, अनिल मारोटकर, दीपक अंबाडरे, विजय सहारे, अशोक केसरखाने, रामदास मते, ज्ञानेश्वर शिंदे, राजेंद्र राऊत, कानतेश्वर पुंड, वैद खा, रुस्तम भाई, रितेश कटाने, दिनेश बावणे, पुंडलिक पुंड, सुरेश हळदे, मारुती बंड, प्रभाकर सुने, युनुस भाई, लक्ष्मण झिमटे, अंकुश शिंदे, शत्रुघ्न मगर, बहादुर खा पठाण, बाबाराव वाघाडे, दिनेश मारोटकर, दिलीप पोहनकर, सुनील बावणे, सतीश मारोटकर, संजय सोनोने, रफिक खा पठाण, अ राजीक शेख सिकंदर, असलम बेग, शब्बीर भाई, हमीद का पठाण, शेख इसराइल पठाण, रमेश काळेकर, युसूफ भाई, सादिक खान, शेख सलीम माजी उपसरपंच, रहेमान खान, निजामुद्दीन पठाण, लक्ष्मीबाई सोळंके, प्रमिला वरठी , कोकिळा राऊत, छाया नेवारे, जया भिसे, शकुंतला मेश्राम, रेखा झिमटे, जिजा सोनोने, द्वारका नेमाडे, रेणुका सोनोने यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.