नांदगाव खंडेश्वर बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मराठा सामाजा वर लाठीहल्लाचा निषेधार्थ*
*मराठा समाजासह विविध संघटना ही सहभागी*
*नांदगाव खंडेश्वर / पवन ठाकरे*
जालना जिल्ह्यातील मराठा समाजाला आरक्षण साठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर अमानुषपणे पोलीसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली त्यामुळे अनेक समाज बांधव जखमी व रुग्णालयात भरती आहेत, उपषोण हे शांत व संयमी पणे सुरळीत सुरू होते, विविध मागण्या साठी मराठा समाज उपषोणाला बसलेले होतै,
या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटण्यास सुरुवात झाली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ आज नांदगाव खंडेश्वर शहर बंदचे आयोजन सकल मराठा कुणबी समाजाच्या वतीने करण्यात आले यावेळी शहरातील बाजारपेठ ही सकाळ पासूनच बंद ठेवण्यात आली होती. या बंद दरम्यान शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.संत गजानन महाराज मंदिरातून निघालेल्या निषेध मोर्चा तहसील कार्यालयात जाऊन तिथे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांना मराठा समाजाच्या शिस्टमंडळाने निवेदन सादर केले. त्यानंतर सर्व मोर्चेकऱ्यांनी मराठा समाजाच्या नेत्यांनी मार्गदर्शन केले.या मोर्चामध्ये बाळासाहेब राणे अमोल धवसे राणे,डॉ.प्रमोद कठाले,डॉ.नितीन टाले,प्रमोद कोहळे, सूर्यपाल चव्हाण,चतुर डांगे, गजानन काजे,निलेश मुधोळकर,दिनेश धवस,आशिष चव्हाळे,मोहन जाधव,पंकज पवार,बाळासाहेब रोहनेकर, प्रशांत देशमुख,राजेश जाधव,शुभम जाधव, विष्णू तिरमारे,दिलीप देवतळे, विलास सावदे,रमेश ठाकरे,प्रशांत धवस,रवींद्र पाटील,योगेश ताठोड,राजू पवार,मनोहर सावत,प्रशांत सावत,संतोष पाटील,बंडू देशमुख यांचेसह असंख्य समाज बांधव यावेळी उपस्थित होते.