क्राइम

बहिणीच्या प्रियकाराचा शिरच्छेद , बहिणीचा गळा चिरला ; आईचे मनगट हातावेगळे केले

Spread the love
चेन्नई  / नवप्रहार मीडिया

 
           त्याला बहिणीचे प्रेमसंबंध मान्य नव्हते. त्याने तिला तशी तंबी दिली होती. पण यानंतर सुद्धा बहीण प्रियकराला भेटत होती. त्यामुळे संतापलेल्या भावाने प्रियकाराचा शिरच्छेद केला. बहिणीचा गळा चिरला आणि आई मधात पडली असता तिचे मनगट हातावेगळे केले. पोलिसांनी आरोपीला।अटक केली आहे.

. मदुराईतील तिरुमंगलमजवळ  रात्री ही भीषण घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवीणकुमारची (22 वर्षे) बहीण ए महालक्ष्मी (वय २५) ही 28 वर्षीय एन सतीशकुमारसोबत रिलेशनशिपमध्ये होती. महालक्ष्मीने चार वर्षांपूर्वी वलयंकुलममधील एका व्यक्तीशी लग्न केलं पण लवकरच त्यांचा घटस्फोट झाला होता. ती सध्या कोंबडी इथं आई-वडिलांसोबत राहत होती, याच ठिकाणी नंतर तिचं आणि सतीशकुमारचं एकमेकांवर प्रेम जडलं होतं.
तिचा धाकटा भाऊ प्रवीणकुमार याला त्याचं रिलेशनशिप मान्य नव्हतं. बहिण महालक्ष्मीनं सतीशकुमारशी संपर्क साधू नये अशी तंबी त्यानं दिली होती. मात्र, महालक्ष्मीनं हे प्रकरण सुरूच ठेवलं आणि मंगळवारी रात्री ९.२० वाजण्याच्या सुमारास प्रवीणकुमारनं सतीशकुमारला कामावरुन घरी परतत असताना बेदम मारहाण केली

पोलिसांनी सांगितले की, आरोपीनं सतीशकुमारवर हल्ला केला, त्याचा शिरच्छेद केला आणि त्याचे शीर जवळच्या थिएटर स्टेज इमारतीत ठेवलं. त्यानंतर, त्यानं घरी जाऊन आपल्या बहिणीचा गळा धारदार शस्त्रानं चिरला. यावेळी त्याची आई ए सेल्वी यांनी यामध्ये हस्तक्षेप केला तेव्हा त्यानं तिच्या उजव्या हाताच्या मनगटावर वार केले आणि तिचा पंजा मनगटापासून छाटला, असंही यात म्हटलं आहे.

या हल्ल्यात महालक्ष्मीचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर प्रवीणकुमार घटनास्थळावरून पळून गेला. सतीशकुमारच्या भावानं कुडाकोविल पोलिसात हत्येची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी प्रवीणकुमारला अटक केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close