नाल्याच्या पुरात माय लेक गेले वाहून ; मुलगा बचावला
महिलेचा मृत्यू , शिरोली सायतखर्डा रस्त्यावरून शेतातून घरी परततांना घडली घटना
घाटंजी तालुका प्रतिनिधी-सचिन कर्णेवार
दोन दिवसांपासून घाटंजी तालुक्यात पाणी सूरु आहे पण,शेतकऱ्यांची कामे केल्याविना गत्यंतर नाही.अशात तालुक्यातील शिरोली सायतखर्डा रस्त्यांवरील सायतखर्डा गावाजवळ असलेल्या नाल्याच्या रपट्यावरून सायंकाळच्या सुमारास शेतातून काम आटोपुन येतांना नाल्याला अचानक पाण्याचा लोंढा आला असता या पुरातून दोघे मायलेक वाहून गेले. मुलगा पुराच्या पाण्यातून कसाबसा बाहेर पडला पण, महिला वाहून गेली.सायतखर्डा गावाजवळ असलेल्या पंगडी सायतखर्डा रस्त्यांवरील पुलाजवळ वाहून गेलेल्या महीलेचा मृतदेह पंगडी सायतखर्डा रस्त्यांवरील नाल्यातील पुलाजवळ सापडला. मृतक महिलेचे नाव सुमित्रा भाऊराव चौधरी वय ४५ रा. सायतखर्डा असे आहे.
दि.७ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या पावसामुळे शिरोली सायतखर्डा रस्त्यांवरील नाल्याला पुर आला.या नाल्यावर रहदारीसाठी एक रपटा आहे तो रपटा कमी उंचीचा असल्यामूळे शेतातून कामं आटोपून सायंकाळी घरी परततांना दोघे मायलेक रपट्यावरून जाताना अचानक आलेल्या पुराच्या ओघात पाण्यात मायलेक वाहून गेले मात्र दैव बलवत्तर म्हणून पुराच्या पाण्यातून मुलगा बाहेर पडला व आई पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने मृत्यू झाली.ही दूखद घटना नातेवाईकांना व गावातील नागरिकांना माहीत झाल्यानंतर शोधाशोध केली असताना महिलेचा मृतदेह गावाशेजारील पंगडी सायतखर्डा रस्त्यांवरील नाल्यातील पुलाजवळ मिळाला. या घटनेची माहिती पारवा पोलीसांना देण्यात आली पारवा पोलीसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली व लगेच मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात घाटंजी येथे पाठविण्यात आला.सदर घटना शवविच्छेदन पाठवण्यात रात्र झाल्यामुळे दि.८ सप्टेंबर रोजी मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला व दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
या दूखद घटनेमुळे सायतखर्डा ग्रामस्थांनी या नाल्यावरील उंची वाढवून पुल बांधण्याची मागणी करण्यात आली आहे.
00000000