नायब तहसीलदार यांनी दिला जिल्हा अधिकाऱ्यांच्या पत्राला खो
तालुका प्रतिनिधी — प्रकाश रंगारी
लोकसभेच्या निवडणूक पूर्वी अमरावती जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य पदाची निवडणुकीचा कार्यक्रम माननीय जिल्हाधिकारी अमरावती यांनी घोषित केला. चांदुर रेल्वे तालुक्यातील चीरोडी,किरजवळा,धोत्रा व जळका जगताप या गावचा सुद्धा समावेश होता. परंतु चांदुर रेल्वे येथील निवडणूक विभागातील नायब तहसीलदार यांनी
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या पत्राला खो देत चीरोडी या गावची वार्ड क्रमांक तीन मधील रिक्त असलेले सदस्य पदाची निवडणूक जिल्हाधिकारी कार्यालयातून लागून सुद्धा नायब तहसीलदार निवडणूक विभाग चांदुर रेल्वे ज्यांनी लावला नाही. अमरावती जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या काही सदस्य आणि काही ठिकाणचे सरपंच पदाच्या ग्रामपंचायतच्या 67 निवडणुका माननीय जिल्हाधिकारी यांनी घोषित केल्या होत्या. परंतु चांदुर रेल्वे तहसील मधील निवडणूक विभागात कार्यरत असलेले नायब तहसीलदार यांनी जिल्हा अधिकारी यांच्या पत्राला खो देत शिरोडी मधील वार्ड क्रमांक तीन च्या निवडणुकीचा कार्यक्रम लावण्यात आला नाही. शिरुड येथील सचिवाने जर तिचा आवाज दिला असेल तर त्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. त्यामुळे चांदुर रेल्वे तहसील मध्ये निवडणूक विभाग कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहे याबाबत नागरिक शंका व्यक्त करत आहे.
————————–
अजय बनारसी नायब तहसीलदार चांदुर रेल्वे
चिरोडे येथील सचिव यांनी पंचायत समिती चांदुर रेल्वेला रिक्त पदाचा चुकीचा अहवाल दिला आणि तोच अहवाल पंचायत समिती यांनी तोच अहवाल मुख्य कार्यपालन अधिकारी अमरावती यांना पाठीवीला आणि पुन्हा तोच अहवाल जसाच्या तसाच जिल्हाधिकारी अमरावती यांना पाठविण्यात आला. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांनी चिरोडी येथील निवडणूक कार्यक्रम लावण्यात आला. चिरुडी येथील सदर प्रकरण हे नागपूर हायकोर्ट मध्ये सुरू असून त्याची मागील तारीख 17/ 1/ 2024 होती. नागपूर हायकोर्ट मध्ये कसलेही प्रकारचा स्टेजच्या संदर्भात निकाल न आल्यामुळे आम्ही निवडणूक लावली नाही.