सामाजिक

नागपूर -मडगाव एक्सप्रेस ला 4 ऑक्टोबर पासून शेगाव येथे थांबा

Spread the love

नागपूर / प्रतिनिधी

राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतूले,प्रवासी संघटना शेगांव शेखर नागपाल यांच्या प्रयत्नाना यश:कोकणातून शेगांवला जाणाऱ्या गजानन महाराज भक्तांची मागणी पुर्ण

खान्देश,विदर्भ ते कोकण जोडणाऱ्या आणि कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ०११३९/०११४० नागपूर मडगाव प्रतिक्षा सुपरफास्ट बी विकली एक्स्प्रेसला ४ ऑक्टोबर पासून थांबा देण्यात आला आहे कोकणातून शेगांवला जाणार्‍या भक्तांची मागणी या थांब्यामुळे पुर्ण झाली आहे
विदर्भातील शेगांव येथील गजानन महाराज संस्थानची विदर्भ पंढरी म्हणून ओळख आहे गजानन महाराज संस्थान कडुन देण्यात येणार्‍या सोयी-सुविधा,शिस्त,पारदर्शी कारभार यामुळे येथे भाविकांची सदैव गर्दी राहते.राज्याच्या विविध भागातून तसेच देशभरातून भाविक शेगांवला येतात.त्यात विदर्भ कोकण जोडणाऱ्या ०११३९/०११४० नागपूर मडगाव प्रतिक्षा सुपरफास्ट बी विकली एक्स्प्रेसला ४ ऑक्टोबरपासून शेगांव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close