नागालँड वाशीयांची पिंपरी जलसेन च्या पाणलोट क्षेत्राचे कामाने प्रभावित
पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील ] – पिंपरी जलसेन मध्ये महानगर बँक व नगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालिका गितांजली शेळके यांच्या नेतृत्वाखाली व गावकऱ्यांच्या एकजूटीने उभे राहिलेले पाणलोट क्षेत्राचे कामाने नागालँड राज्यातून आलेला पहाणी गट प्रभावीत झाला असून असेच पाणलोट क्षेत्राचे काम आम्ही आमच्या नागालँड राज्यात ही करू असा आशावाद ही त्यांनी व्यक्त केला .
पिंपरी जलसेन मध्ये पावसाचे पाणी वाहून जात होते , हे पाणी विविध मार्गांने अडविल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली . त्याचबरोबर दूध धंद्यासाठी दुभती जनावरांची ही संख्या वाढली . नागालँड राज्य सरकारच्या जमीन व संसाधन पाणलोट क्षेत्र विभागातील गटाने पिंपरी जलसेन येथील पाणलोट क्षेत्रात झालेले कामे पाहण्यासाठी थेट भेट दिली . यावेळी या गटातील तज्ञांनी पाणी फाऊंडेशन वॉटर कप स्पर्धेत पिंपरी जलसेन मध्ये झालेल्या विकास कामांचा अभ्यास केला . सलग समतल चर , नालाबंडींग , डीप सी सी टी , माती बंधारे , गॅबीयन बंधारे , विहीर पुर्नभरण व मियावाकी जंगल या कामांचा समावेश आहे .
पारनेर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागात उच्चांकी पातळीवर असलेल्या पिंपरी जलसेनच्या प्राथमिक शाळेला भेट देवून विद्यार्थ्यांशी चर्चा केली व शिक्षकांशी हितगूज साधले . तदनंतर गट शेती स्पर्धेतील तालुकास्तरीय विजेता रोकडोबा शेतकरी भेट देवून शेती पिकांची माहिती घेतली व या गटाने भेंडी हे विषमुक्त पीक उत्पादीत करून बाहेर परदेशात कसे पाठविले , याची माहिती जाणून घेतली .
यावेळी ग्रामस्थांनी नागालँड चे सनी किनोन , गुंभाई लोटा , अचमो नगलू , तेजा , सिमोन , किंकोंग , अल्बन व विक्रम फाटक यांना ग्रामीण ढंगात फेटा बांधून सन्मानीत केल्याने हे सर्व जण खूप भारावून गेले .