Uncategorized

40 भारतीय प्रवाश्यांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली 

Spread the love

14 प्रवाश्यांचा मृत्यू : मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता 

काठमंडू  / नवप्रहार इंटरनॅशनल डेस्क 

                 उत्तराप्रदेश राज्यातील नोंदणी क्रमांक असलेली बस नेपाळ येथील नदीत कोसळल्याने 14 प्रवाश्यांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तनहुन जिल्ह्यातील मार्स्यांगडी नदीत ही बस कोसळल्याचे सांगितले जात असून, यूपी एफटी 7623 नंबर प्लेट असलेली बस पोखराहून काठमांडूच्या दिशेने जात होती.

या अपघातात 14 प्रवाशांच मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता बघता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

 

 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, यूपी एफटी 7623 पासिंग नंबर प्लेट असलेली बस पोखराहून काठमंडूकडे निघाली होती. त्यावेळी अचानक तनहुन जिल्ह्यातील मार्स्यांगडी नदीत कोसळली. सकाळी 11.30 च्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले असून, अपघातग्रस्तांना नदीतून बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून, या अपघातात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे तर, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची भीषणता बघता मृतांचा आकडा वाढण्याची भीती स्थानिका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

 

 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close