ना.सुधिर मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपच्या ४३ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा
राष्ट्रहित व जनकल्याण साठी अविरत कार्यरत राहण्याच्या संकल्प करूया -भाजपा जिल्ह्याध्यक्ष देवराव भोंगळे
घुगघुस /प्रतिनिधी.श्रिनिवास सुद्धाला
शहरातील ना.सुधिर मुनगंटीवार सेवा केंद्रात विविध कार्यक्रमांच्या आयोजनासह भाजपाच्या ४३ वाढ स्थापना दिन शेकडो कार्यकर्त्यांच्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सेवा केंद्राच्या प्रांगणात ज्येष्ठ कार्यकर्त्याच्या शुभहस्ते भाजपाच्या झेंडा फडकविण्यात आला.त्या नंतर उपस्थितांनी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थापना दिनानिमित्त केंद्रीय कार्यलयातुन केलेल्या संबोधनाचे दुरदर्शन वर सामुहिक दृकश्रवन केले.यासोबतच जिल्ह्याध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते बचत गटाच्या माध्यमातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सौ.सुरेखाताई टिपले,सौ.अर्चनाताई पोहिनकर व सौ.प्रणाली बावने यांच्या शाल,श्रिफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
त्या नंतर आमराई वार्डातील वसंता सोळंके यांच्या चालत्या ट्रकच्या टायर फुटल्याने अपघात होऊन ते गंभीर जखमी झाले, त्यामुळे त्यांच्या पत्नी सौ रेणुकाताई सोळंके यांना आर्थिक मदत करण्यात आली.तसेच ना.सुधीर मुनगंटीवार आरोग्य सेवा समितीच्यावतीने ५१ रुग्णांची २१ वी तुकडी ही सेवाग्रामला रवाना करण्यात आली.विविध आजारांसाठी या ५१ रुग्णावर त्या ठिकाणी शस्त्रक्रिया होणार आहे.त्या नंतर सर्व पदाधिकार्यांनी शहरांमध्ये घरोघरी भिंतीवर ”एकबार फिर से भाजपा सरकार”व ”एकबार फिर से मोदी सरकार””अशा घोष वाक्याच्या चित्र रेखाटले या वेळी मार्गदर्शनपर भाषणात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी पक्ष स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा देत आपल्या सर्वच नेत्यांनी घालून दिलेल्या आदर्शवत मार्गक्रमण करत राष्ट्रहित व जनकल्याण साठी अविरत कार्यरत राहण्याच्या संकल्प आज आपण सर्व जण केला पाहिजे असे आवाहन केले.पुढे बोलताना, अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांच्या प्रोत्साहनाने, कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने भाजपाच्या पायारोवला गेला.त्या नंतर नवोदित कार्यशैलिच्या नेते मंडळीच्य सहकार्याने पक्षाची आजतागायत भक्कम उभारणी झाली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाखाली भाजपाच्या सेवाभावी कार्यकर्त्यां कडुन अविरतपणे देशभरात विविध सेवाकार्य चालु आहेत आणि म्हणूनच भाजप हा जनतेच्या हक्कांच्या पक्ष बनला आहे, असेही ते म्हणाले .या कार्यक्रमात भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, तालुका महामंत्री विजय आंग्रे, माजी जि.प.सभापती नितु ताई चौधरी, माजी ग्रा.पं.सदस्य सिंधु इसारप,साजन गोहने,सौ.सुचिता लुटे,सौ.वैशाली ढवस,प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा सौ.किरण बोढे, सुनिता पाटील,अमोल थेरे,रत्नेश सिंग,हेमराज बोंबले,सतिष बोंडे, गणेश खुटेमाटे,दिनेश बांगडे, सुरेंद्र भोंगळे,विक्की सारसर आदीसह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्त्ये व नागरिकांची उपस्थिती होती.