घाटंजीत शिंपी समाजाने संत नामदेव महाराज जयंती उत्साहात केली साजरी
युवकावर समाज संघटनाची धुरा एक आदर्श ;
घाटंजी तालुका प्रतिनिधी- सचिन कर्णेवार
घाटंजी : शहरातील घाटी येथे संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या १५३ व्या जयंती निमित्त घाटंजी शिंपी समाजाच्या वतीने जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष केशवराव सिंगेवार, उद्घाटक पोलिस उपनिरीक्षक विलास सिडाम व पोलिस उपनिरीक्षक नागेश खाडे, प्रमुख अतिथी अनंत नखाते विष्णुजी माकडवार, चंद्रशेखर नोमुलवार, नामदेव गटलेवार, सौ. कविता संतोष कर्णेवार, राजु दीकुंडवार तथा घाटंजी शिंपी समाज अध्यक्ष सचिन कर्णेवार व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आली.यावेळी मान्यवरांचे शाल श्रीफळ व संत नामदेव महाराज प्रतिमा,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी प्रास्ताविक शिंपी समाज अध्यक्ष सचिन कर्णेवार यांनी संत नामदेव महाराज चरित्र व जयंती सोबतच अन्य उपक्रमांची माहिती दिली.यानंतर पोलिस उपनिरीक्षक नागेश खाडे व पोलिस उपनिरीक्षक विलास सिडाम, कविता कर्णेवार यांनी मनोगत व्यक्त केले. पत्रकार अनंत नखाते यांनी घाटंजी हि संताची भुमी या भुमीत जिवन जगताना समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी संतांच्या जयंतीनिमित्त नवीन पिढीला एक आदर्श निर्माण करणारे संघटन शिंपी समाजाने एका तरुण युवकाला समाज संघटनेचा अध्यक्ष करून जेष्ठांनी पाठीशी राहून युवकांवर दाखविलेला विश्वास इतरांना आदर्श निर्माण करणारा असल्याचे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामधे, वैष्णवी कर्णेवार संगीत क्षेत्रात ,विपुल पोटपील्लेवार (आर्मी सेवा) देत असल्या बदल,आरव कर्णेवार, यश पोटपील्लेवार एल.एल.बी झाल्याबद्दल, पुष्पगुच्छ व भेटवस्तु देऊन मान्यवर हस्ते सत्कार करण्यात आला.संत शिरोमणी नामदेव महाराज चौक घाटी येथिल फलकाचे पुजन करून वारकरी संप्रदायातील फुसेकाका यांना शेला नारळ देऊन कवडूजी पोटपील्लेवार,संजय दीकुंडवार यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.व शिंपी समाज भवन घाटी येथिल नियोजीत स्थळी रांगोळी, संगीतमय भजन पूजनाने व चिमुकल्यांनी विविध संतांची वेशभुषा करण्यात आली. संचालन अमोल कर्णेवार त्यांना साथ देत प्रविण कर्णेवार आभार संजय दिकुंडवार यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय दीकुंडवार, शंकर पोटपील्लेवार,बंडूजी बुर्रेवार,काशिनाथ नोमुलवार, पत्रकार संतोष पोटपील्लेवार उमेश अक्केवार,आशिष कर्णेवार, प्रिती नोमुलवार, प्रशांत राजुलवार, संजय दीकुंडवार, संदीप पोटपील्लेवार,बाबु पोटपील्लेवार, शाम गटलेवार, विठ्ठल सिंगेवार तथा इतरही शिंपी समाज संघटना पदाधिकारी यांनी घेतले.कार्यक्रमाची सांगता महाआरती व भोजन करुन करण्यात आली.